देशभरातील ‘कॉन्व्हेंट शाळां’मध्ये हिंदु विद्यार्थ्यांना बायबल शिकण्याची सक्ती करण्यावर प्रतिबंध आणा !

देशभरातील ‘कॉन्व्हेंट शाळां’मध्ये हिंदु विद्यार्थ्यांना बायबल शिकण्याची सक्ती करण्यावर प्रतिबंध आणावी, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात हुपरी, कागल आणि पेठवडगाव येथे देण्यात आले.

उत्तरप्रदेशमध्ये हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या ३ ख्रिस्त्यांना अटक

केंद्र सरकारने धर्मांतरविरोधी कायदा करून त्यात कठोर शिक्षेची तरतूद केल्यावर ख्रिस्त्यांच्या धर्मांतराच्या कारस्थानाला चाप बसेल !

(म्हणे) ‘गोव्यात धर्मांतरविरोधी कायद्याची आवश्यकता नाही !’ – मायकल लोबो, विरोधी पक्षनेते

गोव्यात न्यूनतम १ लाख ५० सहस्र लोकांचे धर्मांतर केले गेले आहे. १५ लाख लोकसंख्या असलेल्या गोव्यातील ही संख्या विरोधी पक्षनेत्यांना अल्प वाटते का ? कि ते पास्टर डॉम्निक याच्या धर्मांतराच्या कारवायांना पाठिंबा देत आहेत ?

धर्मांतरविरोधी कायदा हवाच !

धर्मांतर रोखण्यासाठी प्रसंगी हिंदुत्वनिष्ठांना पोलिसांचा मार खाणे, कारागृहात जाणे अशा दिव्यांना सामोरे जावे लागते. तरीही धर्मांतर रोखण्याचे कार्य ते इमानेइतबारे करतात.

आसाममध्ये हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी ख्रिस्ती धर्मप्रसारकांकडून पारंपरिक बिहू नृत्य आणि संगीत यांचा वापर !

हिंदूंची संस्कृती आणि परंपरा यांचा वापर त्यांच्या धर्मांतरासाठी करणारे कावेबाज ख्रिस्ती ! अशांना ताळ्यावर आणण्यासाठी भारतभर कठोर धर्मांतरविरोधी कायदा राबवून ख्रिस्ती धर्मप्रचारकांवर कारवाई करणे आवश्यक !

जोधपूर येथे हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या चर्चबाहेर ५ जूनला हनुमान चालिसाचे पठण

राज्यातील सर्व आमदारांना राज्याच्या विधानसभेत धर्मांतराचे सूत्र उपस्थित करण्यासाठी विहिंपकडून पत्र देण्यात येणार आहे. अन्य राज्यांप्रमाणे राजस्थानमध्येही धर्मांतराविरोधात कायदा करण्याची मागणी या संघटनांनी केली.

आदिवासींचे धर्मांतर केले जात असल्यावरून प्रशासनाकडून ओडिशातील चर्च बंद  

देशातील प्रत्येक चर्चमध्ये असे काही घडते का ? याचा शोध घेऊन दोषी चर्चवर अशाच प्रकारची कारवाई करावी, अशी हिंदूंनी मागणी केली, तर त्याच चुकीचे ते काय ?

धर्मांतराची केंद्रे असलेल्या कॉन्व्हेंट शाळांची केंद्र सरकारने चौकशी करावी ! – कर्नल राजेंद्र शुक्ला, सेवानिवृत्त अधिकारी, भारतीय सेना

कॉन्व्हेंट शाळांचे आर्थिक स्रोत काय आहेत ? किमान सध्याच्या केंद्र सरकारने तरी धर्मांतराची केंद्रे असणार्‍या कॉन्व्हेंट शाळांची चौकशी करायला हवी !

भारतातील मुसलमान आणि ख्रिस्ती यांचे पूर्वज हिंदूच !

वर्ष २००८ मधील आंध्रप्रदेश शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या एका अहवालात म्हटले होते, ‘भारतातील ८५ टक्के मुसलमान आणि ९८ टक्के ख्रिस्ती यांचे पूर्वज हिंदूच असल्याचे दिसून येते.’ दुर्दैवाने हे धर्मांतरीत हिंदू अधिक कट्टर हिंदुद्वेष्टे झाल्याचे चित्र दिसते.’

नायजेरियात प्रेषितांचा अवमान केल्याचे सांगत ख्रिस्ती विद्यार्थिनीची मुसलमान विद्यार्थ्यांकडून हत्या

जगभरात कुठेही प्रेषित महंमद पैगंबर किंवा कुराण यांचा अवमान झाल्याचे सांगत  जमाव कायदा हातात घेऊन अवमान करणार्‍यांचे जीवन संपवतो. कायद्याला न जुमानण्याची आणि पाशवी पद्धतीने हत्या करण्याची ही मानसिकता समाजस्वास्थ्यासाठी धोकादायक आहे !