लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशातील सहारनपूर आणि आझमगड जिल्ह्यांत ख्रिस्ती मिशनर्यांकडून हिंदूंचे धर्मांतर करण्याच्या प्रकरणी एकूण ३ जणांना अटक करण्यात आली.
१. आझमगडच्या कंधरापूरमध्ये सैतानी आत्म्यावर उपचार करण्याच्या नावाखाली मोहरिल नावाची व्यक्ती लोकांना गोळा करत होती. त्याद्वारे ती गरीब हिंदूंचे धर्मांतर करत होती. आतापर्यंत १०० हून अधिक हिंदूंचे धर्मांतर करण्यात आले आहे. या प्रकरणी हिंदु संघटनांनी तक्रारी केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
(सौजन्य : UK INDIA NEWS)
२. सहारनपूरच्या बेहट गावामध्ये अजय आणि अनिल या दोघांना अटक करण्यात आली. या दोघांनी धर्मांतर केलेले आहे. ते अन्य हिंदूंना धर्मांतर करण्यासाठी त्यांना आमीष दाखवत होते. पोलिसांनी अन्य काही जणांनाही अटक केली आहे.
संपादकीय भूमिकाकेंद्र सरकारने धर्मांतरविरोधी कायदा करून त्यात कठोर शिक्षेची तरतूद केल्यावर ख्रिस्त्यांच्या धर्मांतराच्या कारस्थानाला चाप बसेल ! |