आदिवासींचे धर्मांतर केले जात असल्यावरून प्रशासनाकडून ओडिशातील चर्च बंद  

भुवनेश्‍वर (ओडिशा) – भद्रक जिल्ह्यातील गेल्टुआ गावात असलेले चर्च २४ मे या दिवशी जिल्हा प्रशासनाकडून बंद करण्यात आले. या चर्चमध्ये आदिवासींचे धर्मांतर करण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने हे पाऊल उचलले. या परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. चर्चच्या आजूबाजूला ३ पेक्षा अधिक लोकांनी जमू देऊ नये, असा आदेश देण्यात आला आहे.
भद्रकचे उपजिल्हाधिकारी मनोज पात्रा म्हणाले की, आदिवासींनी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. येथे दोन समुदायांमध्ये हाणामारी झाल्याचे आम्हाला तपासात आढळून आले.

संपादकीय भूमिका 

देशातील प्रत्येक चर्चमध्ये असे काही घडते का ? याचा शोध घेऊन दोषी चर्चवर अशाच प्रकारची कारवाई करावी, अशी हिंदूंनी मागणी केली, तर त्याच चुकीचे ते काय ?