देशभरातील ‘कॉन्व्हेंट शाळां’मध्ये हिंदु विद्यार्थ्यांना बायबल शिकण्याची सक्ती करण्यावर प्रतिबंध आणा !

हिंदु जनजागृती समितीचे हुपरी, कागल आणि पेठवडगाव येथे निवेदन

हुपरी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी स्नेहलता कुंभार यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

कोल्हापूर, ३१ मे (वार्ता.) – देशभरातील ‘कॉन्व्हेंट शाळां’मध्ये हिंदु विद्यार्थ्यांना बायबल शिकण्याची सक्ती करण्यावर प्रतिबंध आणावी, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात हुपरी, कागल आणि पेठवडगाव येथे देण्यात आले.

१. हुपरी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी स्नेहलता कुंभार यांना निवेदन देण्यात आले. या वेळी शिवसेनेच्या नगरसेविका सौ. पूनम राजेंद्र पाटील, ताराराणी आघाडीच्या नगरसेविका माया रावण, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक श्री. दौलत पाटील, नगरसेवक श्री. अमर गजरे, नगरसेवक संदीप वाईंगडे, मराठा समाज युवाआघाडीचे शहरप्रमुख श्री. तुषार मालवेकर, लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेचे शहरप्रमुख श्री. नितीन काकडे, श्री सद्गुरु सेवाभावी संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष श्री. रवींद्र गायकवाड, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री गणेश घोरपडे, सुशांत सनदी, प्रसाद देसाई, हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष सणगर उपस्थित होते.

कागल तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे (डावीकडे) यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

२. कागल तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे यांना निवेदन देतांना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे नवनाथ पाटील, संतोष जाधव, किरण चव्हाण, धर्मप्रेमी किरण कुलकर्णी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. रुद्राप्पा पाटील आणि श्री. संतोष सणगर उपस्थित होते.

पेठवडगाव येथे नगरपालिकेत अधिकारी पाटील (मध्यभागी) यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

३. पेठवडगाव येथे नगरपालिकेत अधिकारी पाटील यांना निवेदन देण्यात आले. या वेळी भाजप युवामोर्चाचे अध्यक्ष विकास कांबळे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. धनंजय गोंदकर, सर्वश्री सागर लोळगे, संकेत चौगुले, राजेंद्र बुरुड, रवींद्र माळी, रणजीत मगदूम, राहुल नकाते, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. मनीषा जगताप, तसेच श्री. संतोष सणगर उपस्थित होते.