श्रीलंकेने आणीबाणी उठवली

राजधानी कोलंबोमध्ये मुसळधार पावसात सहस्रो विद्यार्थ्यांनी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या घरावर मोर्चा काढला. ‘सरकारने चीनला सर्व काही विकून टाकल्याने सरकारकडे आता पैसेच नाहीत’, असा आरोप आंदोलकांनी केला.

चीनमधील २.६ कोटी शांघायवासियांची कोरोना चाचणी होणार !

चिनी सरकारच्या ‘डायनॅमिक झीरो पॉलिसी’ म्हणजे परिस्थितीनुरूप कोरोनाला पूर्ण पायबंद करण्याच्या धोरणामुळे अनेक प्रांतांमध्ये दळणवळण बंदी कठोरतेने राबवली जात आहे.

चिनी रॉकेटचा भाग असण्याची शक्यता ! – खगोलतज्ञ

नागपूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, जळगाव आणि राज्यात अन्य काही ठिकाणी आकाशातून ४ आगीचे गोळे वेगाने शेपटीच्या आकाराच्या प्रकाशासह खाली येतांना २ एप्रिलच्या रात्री ८ वाजता दिसले.

पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांची अपयशी कारकीर्द !

महागाई ! अन्नधान्य, दूध, खाण्याचे सर्व पदार्थ, तसेच बांधकाम उद्योग यांच्या किमती वाढल्या आहेत. त्याचबरोबर अफगाणिस्तानमधून लाखो शरणार्थी पाकिस्तानमध्ये शरण आले आहेत. लोकांना महागाई अल्प आणि हाताला काम पाहिजे असते. तसे काहीही झाले नाही. त्यामुळे पाकिस्तानी जनता सरकारच्या विरोधात गेली आहे.

(म्हणे) ‘चीनने भारतावर आक्रमण केल्यास रशिया भारताच्या बाजूने उभा रहाणार नाही !’ – अमेरिका

भारताने रशियाशीही मैत्री कायम ठेवल्याने अमेरिकेला मिरच्या झोंबल्या आहेत. त्यातून अमेरिका अशी विधाने करून भारताला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे, हे वेगळे सांगायला नको !

चीनच्या सर्व ३१ प्रांतांमध्ये कोरोनाचा संसर्ग : ५ शहरांत दळणवळण बंदी

चीनच्या सर्व ३१ प्रांतांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी चीनने कार्यान्वित केलेली ‘झीरो कोविड पॉलिसी’ही कुचकामी ठरतांना दिसत आहे.

पाकमध्ये चिनी कामगार करत आहेत ख्रिस्ती आणि मुसलमान तरुणींची तस्करी

पाकमध्ये पाकिस्तानी पोलीस एरव्ही मानव तस्करी करणार्‍यांवर कारवाई करते; मात्र चिनी कामगारांवर कारवाई करण्यास धजावत नाही. याला पाक सरकारचे चीनशी असलेले चांगले संबंध कारण असल्याचे सांगितले जात आहे.

चीनमध्ये कोरोनाच्या नव्या लाटेमुळे घातलेल्या निर्बधांच्या विरोधात नागरिकांचे आंदोलन

नागरिकांना अन्नधान्य पुरवठ्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. व्यवसाय बंद असतांना अनेकांसमोर ‘घराचे भाडे कसे देणार ?’ असा प्रश्‍न पडला आहे. त्यामुळे नागरिकांनी दळणवळण बंदी मागे घेण्याची आग्रही मागणी केली आहे.

चीनने प्रथम सीमेवरून सैन्य हटवावे, तरच द्विपक्षीय संबंध सामान्य होतील !

वर्ष २०२० च्या गलवान खोर्‍यात झालेल्या संघर्षानंतर दोन्ही देशांतील सर्वोच्च स्तरावरील ही पहिलीच चर्चा आहे. प्रत्येक वेळी भारताने पूर्व लडाखमध्ये चीनने सैन्य पूर्णपणे मागे घेण्याचे आवाहन केले आहे.