पाकमधील ‘ओआयसी’ परिषदेत चीनचा सहभाग !

हा पाक आणि चीन यांचा भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे ! आगामी काळात सरकार एकाच वेळी पाक आणि चीन यांचा सामना कसा करणार आहे ?

भारताला कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका अल्प आहे ! – पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर

भारतात ‘ओमायक्रॉन’ची तिसरी लाट असतांनाच सर्वसाधारणपणे १०० पैकी ७५ जणांना ‘बीए.२’ या नव्या व्हेरिएंटची लागण होऊन गेलेली आहे. चीनमध्ये १ मासानंतर स्थिती स्पष्ट झाल्यानंतरच कोरोनाच्या चौथ्या लाटेविषयी नेमकेपणाने सांगता येईल.

एका वर्षानंतर प्रथमच चीनमध्ये कोरोनाचे बळी !

कोरोना महामारी चालू झाल्यानंतर चीनमध्ये आटोक्यात आणण्यात आलेला संसर्ग आता पुन्हा वेगाने पसरत आहे. ३ आठवड्यांपूर्वी प्रतिदिन १०० जणांना याचा संसर्ग होत होता. ती संख्या आता प्रतिदिन १ सहस्राहून वर गेली आहे.

चीनने रशियाला सैनिकी साहाय्य केले, तर चीनवर कारवाई करण्यास मागे-पुढे पहाणार नाही ! – अमेरिकेची चीनला चेतावणी

युक्रेनसमवेतच्या युद्धात चीन सैनिकी उपकरणांच्या माध्यमातून रशियाला साहाय्य करण्याचा प्रयत्न करत आहे. रशियाला पाठिंबा देणार्‍या कोणत्याही कृतीला चीन उत्तरदायी असेल.

भारत ‘पाकव्याप्त काश्मीर’ आणि ‘अक्साई चीन’ ताब्यात घेऊ शकतो का ?

अनेकांना वाटते की, ज्या प्रकारे रशियाने युक्रेनवर आक्रमण केले, त्याप्रमाणे भारतानेही पाकिस्तानच्या कह्यात असलेला ‘पाकव्याप्त काश्मीर’ आणि चीनच्या कह्यात असलेला ‘अक्साई चीन’ यांवर आक्रमण करून त्यांना कह्यात घ्यावे. सैनिकीदृष्ट्या हे शक्य असले, तरी यात अनेक आव्हाने आहेत.

चीनमधील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवरून भारताच्या केंद्रीय मंत्र्यांनी घेतली उच्चस्तरीय बैठक

या बैठकीत आरोग्यमंत्र्यांनी अधिकार्‍यांना रुग्णसंख्या वाढण्याविषयी सतर्कता, संसर्गावर बारीक लक्ष ठेवणे आणि अधिकाधिक ‘जीनोम सिक्वेन्सिंग’ तपासणी करण्यास सांगितले आहे.

रशियाकडे केवळ १० दिवस पुरेल इतकाच दारुगोळा शिल्लक ! – अमेरिकेच्या माजी सैन्यदल प्रमुखाचा दावा

युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाला २० दिवस झाले असले, तरी ते अद्याप थांबलेले नाही. या पार्श्‍वभूमीवर ‘रशियाकडे केवळ १० दिवस उरले आहेत. या १० दिवसांत युक्रेनने खिंड लढवली, तर रशिया आपोआपच चितपट होईल, असा दावा अमेरिकेचे माजी सैन्यदल प्रमुख बेन होजेस यांनी केला आहे.

रशियाला साहाय्य केल्यास कठोर कारवाई करू ! – अमेरिकेची चीनला धमकी

जर रशियावर घालण्यात आलेल्या निर्बंधांच्या संदर्भात चीनने रशियाला साहाय्य केले, तर चीनवर कठोर कारवाई करू, अशी धमकी अमेरिकेने चीनला दिली आहे.

चीनमध्ये पुन्हा वाढत आहे कोरोनाचा संसर्ग

चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या माहितीनुसार प्रतिदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत दुपटीने वाढ होत आहे.

चीन आणि भारत यांच्यातील सैन्य स्तरावरील बैठक देपसांग आणि डेमचोक येथून चीनने त्याचे सैन्य माघारी न्यावे ! – भारताची मागणी

अशा मागण्यांना चीन भीक घालणार नाही. त्यासाठी आक्रमक धोरण राबवून चिनी सैनिकांना तेथून हाकलून लावणे आवश्यक आहे !