(म्हणे) ‘चीनने भारतावर आक्रमण केल्यास रशिया भारताच्या बाजूने उभा रहाणार नाही !’ – अमेरिका

भारताने रशियाशीही मैत्री कायम ठेवल्याने अमेरिकेला मिरच्या झोंबल्या आहेत. त्यातून अमेरिका अशी विधाने करून भारताला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे, हे वेगळे सांगायला नको ! – संपादक

डावीकडून भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला आणि अमेरिकेचे उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लगार दलीप सिंह

वॉशिंग्टन (अमेरिका) – रशिया आणि चीन यांच्यातील मैत्रीचे नाते फार घट्ट आहे. सध्या हे दोन्ही देश अधिक जवळ आले आहेत. त्यामुळे ‘चीनने भारतावर आक्रमण केल्यास रशिया भारताच्या बाजूने उभा राहील’, या भ्रमात भारताने राहू नये, असे विधान अमेरिकेचे उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लगार दलीप सिंह यांनी भारताला चेतावणी देतांना केले. दलीप सिंह काही दिवसांत भारताच्या दौर्‍यावर येणार आहेत. त्यापूर्वीच त्यांनी हे विधान केले आहे. यापूर्वी भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी त्यांची भेट घेतली आहे. या मुलाखतीनंतर दलीप सिंह यांनी भारताने रशिया-चीन यांच्या मैत्रीची नोंद घेणे आवश्यक असल्याचे म्हटले.
रशियाने भारताला स्वस्तात तेल देण्याच्या प्रस्तावाविषयी विचारले असता दलीप सिंह म्हणाले, ‘‘जागतिक निर्बंधांच्या कक्षेत येणार्‍या कोणत्याही वस्तू भारताने रशियाकडून खरेदी करू नयेत. अशा वस्तूंचा व्यापार वाढल्याचे दिसता कामा नये.’’