सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात राहून साधना करणारे चि. विक्रम डोंगरे आणि चि.सौ.कां. योगिता पालन यांचा २२.४.२०२५ (चैत्र कृष्ण नवमी) या दिवशी विवाह आहे. त्यानिमित्त त्यांचे नातेवाईक आणि साधक यांच्या लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
चि. विक्रम डोंगरे आणि चि.सौ.कां. योगिता पालन यांना शुभविवाहानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

चि. विक्रम डोंगरे यांची गुणवैशिष्ट्ये
श्री. विक्रम डोंगरे हे अभियंता (इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीयर) आहेत. ते एका नामांकित आस्थापनात नोकरी करत होते. ते ‘सनातन प्रभात संकेतस्थळा’च्या समन्वयाची सेवा करतात.
१. सौ. नेहा प्रभु (श्री. विक्रम यांची मामेबहीण), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१ अ. आधार वाटणे : ‘विक्रमदादाचे मला नेहमी साहाय्य मिळते. माझे वडील (कै. किशोर घाटे) रुग्णाईत होते. वडिलांना रुग्णालयात भरती केले होते. नंतर त्यांचे निधन झाले. तेव्हा मला विक्रमदादाने पुष्कळ साहाय्य केले. तेव्हा मला दादाचा आधार वाटला.
१ आ. अभ्यासपूर्ण सेवा करणे : दादा समाजातील प्रतिष्ठित हिंदुत्वनिष्ठांच्या मुलाखती (पॉड कास्ट) घेण्याची सेवा करतो. त्या वेळी तो अभ्यासपूर्वक प्रश्न विचारतो. ‘तो पुष्कळ हुशार असून त्याच्या सेवेचे दायित्व तो चांगल्या प्रकारे पार पाडतो’, असे मला वाटते.’
२. कु. मानसी प्रभु (श्री. विक्रम यांची भाची), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
२ अ. साधनेत साहाय्य करणे : ‘विक्रममामाचे मला साधनेमध्ये बरेच साहाय्य होते. साधनेत येणार्या अडथळ्यांविषयी मी मामाशी मोकळेपणाने बोलते. तेव्हा तो मला सहजतेने योग्य उपाय सांगतो.
२ आ. उत्साहाने आणि आनंदाने सेवा करणे : मामाकडे अनेक सेवांचे दायित्व आहे; परंतु त्याच्या चेहर्यावर कधीच ताण जाणवत नाही. तो नेहमी उत्साही आणि आनंदी असतो. ‘सेवा अधिकाधिक चांगली कशी होईल ?, असा त्याचा सतत विचार असतो.’
३. श्री. चेतन हरिहर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
३ अ. ‘विक्रमदादा नेहमी उत्साही असतात आणि ते इतरांनाही उत्साही बनवतात.
३ आ. साधकांच्या चुका प्रेमाने सांगून त्यांना प्रयत्न करण्यासाठी दिशा देणे : ‘सनातन प्रभात संकेतस्थळा’च्या संदर्भात सेवा करणार्या साधकांचा प्रत्येक आठवड्याला सत्संग असतो. सत्संगात साधकांनी आपली चूक सांगितल्यावर त्यांनी ‘प्रयत्न कसे करावेत ?’, याविषयी विक्रमदादा सांगतात. तेव्हा संबंधित साधक उत्साहाने प्रेरित होतो आणि म्हणतो, ‘‘आता मी प्रयत्न करीन आणि पुन्हा अशी चूक होऊ देणार नाही.’’ विक्रमदादा साधकांची चूक प्रेमाने सांगतात. त्यामुळे साधक दुखावले जात नाहीत आणि ते शिकण्याच्या भूमिकेत रहातात.
३ इ. साधकांच्या सेवेतील अडचणी सोडवणे : एकदा मी त्यांना कर्नाटक येथील काही साधकांच्या अडचणी सांगितल्या. तेव्हा ते म्हणाले, ‘‘काळजी करू नकोस. मी त्या साधकांशी बोलेन. ते साधक सेवेसाठी वेळ देतात, तर मी थोडा वेळ काढून त्यांच्या अडचणी समजून घेईन.’’ दादांनी साधकांना भ्रमणभाष करून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि त्यांना मार्गदर्शन केले. त्यामुळे ते साधक पूर्वीपेक्षा अधिक उत्साहाने सेवा करू लागले.’
४. ‘सनातन प्रभात’च्या संकेतस्थळ सेवेशी संबंधित साधक
४ अ. सहजता : ‘विक्रमदादांमध्ये सहजता असल्यामुळे साधक त्यांना सेवेसंबंधीच्या अडचणी मोकळेपणाने सांगू शकतात. दादा साधकांच्या अडचणीवर योग्य प्रकारे दिशादर्शन करतात.
४ आ. नियोजनपूर्वक सेवा करणे : सनातन प्रभात संकेतस्थळाच्या समन्वयाची सेवा करतांना दादा ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांतील वृत्ते आणि लेख वाचकांपर्यंत लवकर पोचावेत, यासाठी चांगल्या प्रकारे नियोजन करतात. राष्ट्र आणि धर्म यांसंबंधीच्या काही महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या वेळी दादा साधकांचे सत्संग घेऊन सेवांचे नियोजन करून देतात.
४ इ. साधकांना सेवेत साहाय्य करणे : दादा सहसाधकांना सेवेमध्ये चांगल्या प्रकारे साहाय्य करतात. वर्ष २०२४ मध्ये सनातन प्रभात संकेतस्थळाशी संबंधित सेवा करणार्या साधकांसाठी शिबिर झाले होते. दादांच्या मार्गदर्शनामुळे साधकांनी त्या शिबिराचे नियोजन, विषय घेणे इत्यादी सर्व सेवा चांगल्या प्रकारे केल्या.’
५. श्री. मनोज कात्रे, पुणे
५ अ. हसतमुख स्वभाव : ‘विक्रमदादा नेहमी आनंदी असतो आणि इतरांशी हसतमुखाने बोलतो. त्याच्याशी मनमोकळेपणाने बोलता येते. त्याच्याशी बोलल्यानंतर साधकांमधील उत्साह वाढतो.
५ आ. सकारात्मक वृत्ती : जुलै २०२४ मध्ये रामनाथी आश्रमात एका शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरासाठी काही दिवस शेष असल्याने शिबिराची पूर्वसिद्धता करण्यासाठी अल्प अवधी होता. त्या वेळी विक्रमदादा नेहमी ‘शिबिराची सर्व सेवा वेळेत पूर्ण होईल’, असे सांगत असे आणि सेवेचे नियोजन करून देत असे. त्या वेळी ‘सतत सकारात्मक कसे रहायचे ?’, हे मला शिकायला मिळाले.
५ इ. प्रेमभाव : विक्रमदादाने सेवेतील सर्व साधकांना जोडून ठेवले आहे. त्यामुळे बरेच साधक घरी राहून आपले कौटुंबिक दायित्व, नोकरी, व्यवसाय आदी सांभाळून ही सेवा नियमित करत आहेत. एखादा साधक अनेक दिवस सेवा करत नसेल, तर दादा स्वतःहून त्याला संपर्क करून आत्मीयतेने त्याची चौकशी करतो. दादाची सेवेची तळमळ आणि पुढाकार यांमुळे या शिबिराचे आयोजन होऊ शकले. अनेक दिवस एकत्र सेवा करूनही एकमेकांना न भेटलेल्या साधकांची शिबिरामुळे रामनाथी आश्रमात भेट झाली आणि त्यांची एकमेकांविषयी जवळीक वाढली.
५ ई. भावपूर्ण बोलणे : विक्रमदादा शांत आणि संयमीपणे बोलतो. ‘दादा सत्संग आणि शिबिर यांमध्ये विषय मांडत असतांना तो ऐकत रहावा’, असे वाटते. तो भावपूर्णरित्या विषय मांडत असल्याने त्याचे बोलणे अंतर्मनापर्यंत जाऊन मनावर सकारात्मक परिणाम जाणवतो.
५ उ. शिबिराच्या वेळी रामनाथी आश्रमात गेल्यानंतर बर्याच वर्षांनी मी विक्रमदादाला पाहिले. तेव्हा मला त्याच्या तोंडवळ्यावर पुष्कळ तेज जाणवले.
‘हे श्रीकृष्णा, विक्रमदादासारख्या आदर्श साधकांचा सत्संग मला देत आहेस, यासाठी कृतज्ञता !’ (१३.४.२०२५)
६. सेवेची तळमळ
अ. विक्रमदादांना ‘सनातन प्रभात’ची वाचकसंख्या वाढावी, तसेच त्यांतील माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावी, यांसाठी काय करता येईल ?’, याचा ध्यास असतो. त्यासाठी ते दिवसरात्र कष्ट करण्यास सिद्ध असतात.
आ. दादांना ‘सनातन प्रभात’ची कीर्ती जगभर पोचायला हवी’, असा ध्यास असतो. दादांनी जगभरातील विविध हिंदुत्वनिष्ठ, विचारवंत आणि धर्मप्रेमी यांना संपर्क करून त्यांना सनातन प्रभातविषयी माहिती दिली आहे. या हिंदुत्वनिष्ठांमुळे जगभरातील हिंदूंवर होणारे अत्याचार किंवा धर्मावरील आघात यांविषयी सनातन प्रभातला माहिती मिळणे सुलभ होत आहे.
इ. पूर्वीपासून ‘सनातन प्रभात’ नियतकालिकाच्या विविध मोहिमा चालू असायच्या; पण आता ज्या मोहिमा घेतल्या जातात, त्या समाजाभिमुख करतांना ‘शासन, प्रशासन आदी विविध स्तरांवर त्याचे उमटणारे पडसाद, या सर्वांचे वार्तांकन आणि त्यांचे व्हिडिओ सिद्ध करून त्यात मिळालेले सुयश प्रसारित करणे’, यांमध्येही विक्रमदादांचा मोठा वाटा आहे.
ई. डिसेंबर २०२२ मध्ये दादांच्या वडिलांचे (श्री. अरुण डोंगरे, वय ७२ वर्षे यांचे) हृदयाचे शस्त्रकर्म झाले होते. तेव्हा विक्रमदादा वडिलांची शुश्रूषा करण्यासाठी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात ३ मास राहिले होते. वडिलांची सेवा करत असतांनाच वृत्तांचे संपादन करणे, समन्वय करणे इत्यादी सेवा दादांनी केल्या. या सर्वांचा परिणाम म्हणजे ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी आरंभ केलेल्या ‘सनातन प्रभात’चे नाव आज भारतभर होत आहे आणि त्याला एक कोंदण देण्याची सेवा श्री. विक्रम करत आहेत’, असे जाणवते.’
– ‘सनातन प्रभात’च्या नियतकालिकासंबंधी सेवा करणारे साधक, रामनाथी, फोंडा, गोवा. (१३.४.२०२५)
‘सनातन प्रभात’ची कीर्ती जगभर पोचायला हवी’, या ध्यासाने देश-विदेशांतील हिंदुत्वनिष्ठांना ‘सनातन प्रभात’च्या कार्याशी जोडणारे एक अष्टपैलू व्यक्तीमत्त्व – श्री. विक्रम डोंगरे !
१. शिकण्याची वृत्ती : ‘विक्रमदादांचे व्यक्तीमत्त्व अष्टपैलू आहे. त्यांनी ‘सनातन प्रभात’ नियतकालिकाच्या संदर्भातील सेवा करतांना विविध गोष्टी आत्मसात केल्या आहेत, उदा. चलतचित्रे (व्हिडिओ) बनवणे, त्यांचे संकलन करणे, वृत्तांचे भाषांतर आणि संपादन करणे इत्यादी. त्यामुळे एखाद्या सेवेत साधकांची कमतरता भासल्यास दादा ती सेवा स्वतः करतात.
२. अभ्यासू वृत्ती : दादा एखाद्या सेवेचा अभ्यास सर्वांगांनी करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे साधकांना त्या सेवेतील अनेक बारकावे शिकायला मिळतात. त्या त्या सेवांचे नियोजन करतांना दादांनी केलेल्या अभ्यासाचा लाभ होतो.
३. ‘सनातन प्रभात’मध्ये काळानुरूप पालट करण्यासाठी प्रयत्न करणे : ‘सनातन प्रभात’ला २५ वर्षे पूर्ण होत असतांना दैनिकामध्ये काळानुरूप काही पालट करायला हवेत’, यासाठी दादा प्रयत्नशील असतात. याविषयी ते केवळ सूत्र न मांडता त्यासाठी प्रयत्नही करतात, तसेच साधकांनाही तसे करण्याची प्रेरणा देतात.
४. सामाजिक प्रसारमाध्यमांचा कौशल्याने उपयोग करून प्रसार करणे : ‘सनातन प्रभात’चे ‘यू ट्यूब चॅनेल’ चालू करून त्यावर विविध हिंदुत्वनिष्ठांच्या मुलाखती घेणे, त्या प्रसारित करणे, अयोध्येतील श्रीराममंदिराचे उद्घाटन, प्रयागराज येथे झालेला कुंभमेळा आदी महत्त्वाच्या ठिकाणी ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहरांचे नियोजन करणे, तेथे जाऊन वैशिष्ट्यपूर्ण मुलाखती घेणे, प्रत्यक्ष वार्तांकन करणे, या सर्वांचे व्हिडिओ सिद्ध करून ते प्रसारित करणे इत्यादी सेवांमध्ये विक्रमदादांचा बहुमोल वाटा आहे.
५. देश-विदेशांतील हिंदुत्वनिष्ठांना ‘सनातन प्रभात’च्या कार्याशी जोडणे : विक्रमदादा देश-विदेशांतील हिंदुत्वनिष्ठांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांचे वार्तांकन करणे, त्या कार्यक्रमांच्या अनुषंगाने त्यांच्या मुलाखती घेऊन त्याचे व्हिडिओ सिद्ध करून ते प्रसारित करणे, अशा सेवाही करतात. यांमुळे देश-विदेशांतील अनेक हिंदुत्वनिष्ठ ‘सनातन प्रभात’च्या कार्याशी जोडले आहेत.
सेवेची तीव्र तळमळ असलेले श्री. विक्रम डोंगरे !
‘श्री. विक्रम डोंगरे यांच्या संदर्भात सांगायचे म्हणजे केव्हाही पहा, त्याला सेवेविना काही सुचतच नाही. आम्ही गेली ४ – ५ वर्षे एकत्र एका खोलीत रहात होतो. त्याने माझी पुष्कळ काळजी घेतली. आमच्या खोलीची सामूहिक स्वच्छता तो प्रतिमास ५ – ६ घंटे एकटा करायचा. खोलीची दैनंदिन स्वच्छतेची सेवा चालू असतांनाही त्याचे सेवेनिमित्त भ्रमणभाषवर बोलणे चालूच असायचे. त्याचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व आहे. प्रतिष्ठित पाहुण्यांशी तो इंग्रजीमधूनच संभाषण करायचा. त्याच्यात प्रेमभाव पुष्कळ आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांविषयी त्याच्या मनात पुष्कळ भाव आहे. त्याचा स्वभाव मनमोकळा असून तो सतत आनंदावस्थेत असतो.’
– श्री. देवदत्त कुलकर्णी (वय ८२ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.४.२०२५)

चि.सौ.कां. योगिता पालन यांची गुणवैशिष्ट्ये गुरूंप्रती भाव असल्याने साधकांकडून भावजागृतीचे चांगले प्रयत्न करून घेणे
योगिताचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याप्रती पुष्कळ भाव आहे. ती आश्रम स्तरावरील भावसत्संग आणि साधकांच्या व्यष्टी साधनेचे आढावे घेते. त्यात ‘वेगवेगळ्या कृती करतांना भाव कसा ठेवायचा ?’, याविषयी तिला नवीन सूत्रे सुचतात. ती सूत्रे ती सत्संगात उत्तम रितीने मांडते. भावसत्संग घेत असतांना तिच्यामध्ये शरणागतभाव जाणवतो. तेव्हा ‘ती देवाला आणि गुरुदेवांना मनापासून आळवत आहे’, असे वाटते.’
१. श्रीमती भारती पालन (चि.सौ.कां. योगिताची आई, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ६८ वर्षे), फोंडा, गोवा.
१ अ. शांत स्वभाव : ‘योगिता लहानपणापासूनच शांत स्वभावाची असून तिने कधीही कोणाला त्रास दिला नाही.
१ आ. स्वावलंबी : ती स्वावलंबी असून स्वतःच्या सर्व गोष्टी स्वतःच करते. ती लहानपणापासून स्वतःचा अभ्यासही स्वतःच पूर्ण करायची.
१ इ. समाधानी वृत्ती : तिने कधीही कुठल्याही वस्तूसाठी हट्ट किंवा मागणी केली नाही. आता ती साधनेमुळे अधिक स्थिर आणि समाधानी झाली आहे.’
२. श्री. विनोद पालन (चि.सौ.कां. योगिताचा भाऊ), पुणे
२ अ. त्यागी वृत्ती : ‘योगितामध्ये त्याग करण्याची वृत्ती आहे. ती तिच्याकडील वस्तू सहजपणे इतरांना देते. ती स्वतःला आवडणारे पदार्थ स्वतःसाठी थोडे ठेवून इतरांना अधिक प्रमाणात देते.
२ आ. लहान मुलांशी मैत्री होणे : योगिता लहान मुलांना हवीहवीशी वाटते. ती सहजतेने लहान मुलांची आवडती बनते. तिच्यामध्ये निरागसता आणि मनाची निर्मळता असल्याने ती लहान मुलांना त्यांची मैत्रीणच वाटते.
२ इ. साधकांशी जवळीक असणे : योगिताला आश्रमातील सर्व साधक जवळचे वाटतात, तसेच साधकांनाही योगिता जवळची वाटते. ‘सर्व साधक आपल्या परिवारातीलच आहेत’, असे तिला वाटते.’
३. सेवेशी संबंधित साधक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
३ अ. अनासक्त : ‘योगिताला मायेतील गोष्टींची आसक्ती नाही. तिला ‘कपडे, दागिने किंवा वेगळ्या प्रकारचे खाणे-पिणे’ यांत विशेष रस नसतो. जे उपलब्ध आहे, ते ती आनंदाने स्वीकारते.
३ आ. हसतमुख : योगिता नेहमी हसतमुख असते. तिच्याकडे आश्रम स्तरावरील काही समष्टी सेवा आहेत. त्या करतांना तिला काही वेळा शारीरिक किंवा आध्यात्मिक त्रास होता, तरीही ती हसतमुख असते. बाेलण्यातील चातुर्य आणि विनोदी वृत्ती यांमुळे ती इतरांना हसवते.
३ इ. सहनशीलता : योगिता सहनशील असून कोणत्याही परिस्थितीत स्थिर असते. ती स्वतःला होत असलेले त्रास किंवा अडचणी इतरांना न सांगता त्यांवर मात करण्याचा प्रयत्न करते.
३ ई. प्रेमभाव : प्रेमभाव असल्यामुळे योगिताला इतरांना साहाय्य करण्याची पुष्कळ तळमळ आहे. काही वेळा तिची शारीरिक स्थिती चांगली नसते किंवा तिला आध्यात्मिक स्तरावर काही त्रास होत असतात, तरीही ती इतरांना साहाय्य करण्यास सिद्ध असते. साधकही तिच्याकडे हक्काने साहाय्य मागतात.
३ उ. परिपूर्ण सेवा करणे : योगिताचा परिपूर्ण सेवा करण्याकडे नेहमीच कल असतो. भक्तीसत्संगाच्या संहितेमध्ये काही शब्द किंवा व्याकरण यांच्या त्रुटी राहिल्यास त्या तिला अचूकपणे लक्षात येतात.
३ ऊ. गुरूंप्रती भाव असल्याने साधकांकडून भावजागृतीचे चांगले प्रयत्न करून घेणे : योगिताचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याप्रती पुष्कळ भाव आहे. ती आश्रम स्तरावरील भावसत्संग आणि साधकांच्या व्यष्टी साधनेचे आढावे घेते. त्यात ‘वेगवेगळ्या कृती करतांना भाव कसा ठेवायचा ?’, याविषयी तिला नवीन सूत्रे सुचतात. ती सूत्रे ती सत्संगात उत्तम रितीने मांडते आणि साधकांकडून भावजागृतीचे प्रयत्न करवून घेते. ती भावसत्संग घेत असतांना तिच्यामध्ये शरणागतभाव जाणवतो. तेव्हा ‘ती देवाला आणि गुरुदेवांना मनापासून आळवत आहे’, असे वाटते. तिची प्रार्थना ऐकून भावजागृती होते.’
४. सुश्री (कु.) सोनल जोशी (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४४ वर्षे) , सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
‘योगिता’ असे कोमल फूल भगवंताचे ।
‘योगिता’ असे एक कोमल फूल भगवंताचे ।
निर्मळ आणि सुंदर असे ते फूल गुरुमाऊलींचे(टीप) ।। १ ।।
फुलाच्या सुगंधाने करी प्रसन्न ते सर्वांना ।
देऊन प्रेम अन् आधार शब्दांतूनी जनांना ।। २ ।।
योगिता, तुझ्या रूपाने दिली देवाने एक मैत्रीण खास ।
कधीच कंटाळली नाहीस तू आम्हा साहाय्य करण्यास ।। ३ ।।
आज प्रार्थना करते मी श्री गुरुचरणी ।
कृपा करावी या आमच्या प्रेमळ साधिकेवरी ।। ४ ।।
द्यावा तिला आनंद, समृद्धी अन् समाधान ।
साधनेत जाऊ दे ती पुढे, तुम्हाला अपेक्षित अशी छान ।। ५ ।।
टीप – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
(लिखाणातील सर्व सूत्रांचा दिनांक : ९.४.२०२५)
उखाणे• मांडवाच्या दाराला आंब्याचे तोरण । • अर्जुनाच्या रथावर श्रीकृष्ण सारथी । |