
१. साधकांशी सहजपणे संवाद साधून त्यांना आनंद देणे
‘एकदा मी सेवेनिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेलो होतो. तेव्हा मी आणि काही साधक उद्वाहकाने वरच्या माळ्यावरून खाली येत होतो. उद्वाहकाचा दरवाजा उघडल्यावर मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि काही साधक समोर उभे असल्याचे दिसले. त्यांना पाहून आम्हाला आनंद झाला. आम्हाला पाहिल्यावर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ सहजतेने म्हणाल्या, ‘‘या, आम्ही तुमच्या स्वागतासाठीच थांबलो होतो.’’ हे ऐकून आम्हाला पुष्कळ आनंद झाला. आताही हा प्रसंग आठवल्यावर मला आनंद होतो.

२. आध्यात्मिक आईप्रमाणे वागणार्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ !
एकदा दत्तात्रेयांच्या पादुकांची मिरवणूक रामनाथी आश्रमासमोरून जाणार होती. सर्व साधक पादुकांचे दर्शन घेण्यासाठी जमले होते. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळही तेथे आल्या होत्या. अन्य ठिकाणी मुख्य व्यक्ती नेहमी पुढे असते; पण श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी असूनही सर्व साधकांच्या मागे उभ्या होत्या. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ या सर्व साधकांच्या आध्यात्मिक आई आहेत. आई आपल्या मुलांना जसे पुढे करते, तसे त्यांनी केले’, असे मला जाणवले.
३. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ दत्ताच्या पादुकांकडे पहात असतांना मला त्यांच्या चेहर्यावर शांतता आणि भाव यांची स्पंदने जाणवत होती.
४. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रमाणे श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ शिष्यभावात रहातात’, असे मला जाणवले. मी माझे हे अनुभव श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या चरणी समर्पित करतो.’
– श्री. प्रशांत हरिहर, मंगळुरू, कर्नाटक. (१८.१२.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |