SANATAN PRABHAT EXCLUSIVE : श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीचे पुन्हा संवर्धन करण्यापूर्वी त्याचे दायित्व निश्‍चित करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघाची मागणी

आता जे संवर्धन होणार आहे, त्या संवर्धानामुळे मूर्तीची हानी झाली, तर त्याचे नेमके दायित्व निश्‍चित करणे आवश्यक आहे. हे दायित्व निश्‍चित होत नाही, तोपर्यंत संवर्धनास स्थगिती देण्यात यावी – महाराष्ट्र मंदिर महासंघ

केंद्रीय पुरातत्व विभागाकडून पुन्हा एकदा श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीचे अशास्त्रीय पद्धतीने संवर्धन करण्याचे निश्‍चित !

केंद्रीय पुरातत्व विभाग १४ आणि १५ एप्रिल या दिवशी श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीचे संवर्धन करणार आहे. या कालावधीत भाविकांना श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेता येणार नाही.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याचे नाव हे ‘शिवनेर’ तालुका असल्याचे अनेक पुरावे सापडले !

छत्रपती शिवरायांच्या जन्मस्थानामुळे शिवनेर या नावाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे जुन्नर या नावात पालट करून ‘शिवनेरी’ तालुका असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी जनतेतून होत आहे.

करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तींची वारंवार रासायनिक संवर्धन करूनही पुन्हा एकदा झीज !

पुरातत्व विभागाचे निवृत्त अधिकारी आर्.एस्. त्र्यंबके आणि विलास मांगीराज यांनी करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीची पहाणी केलेला अहवाल ४ एप्रिल २०२४ या दिवशी न्यायालयात सादर झाला.

शिवलिंगाचे जतन आणि संरक्षण शास्त्रोक्त पद्धतीने करण्यासाठी उपाययोजना काढा !

त्र्यंबकेश्‍वर येथील मंदिरातील शिवपिंडीचा वज्रलेप निखळला आहे. या प्रकरणी विधानसभेच्या उपसभापती डॉ. नीलम गोेर्‍हे यांनी ‘त्र्यंबकेश्‍वर देवस्थान ट्रस्ट’च्या अध्यक्षांना तातडीचे पत्र पाठवून ‘शिवलिंगाचे जतन आणि संरक्षण शास्त्रोक्त पद्धतीने करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना काढावी.

भोजशाळेच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार !

धार येथील भोजशाळेच्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून करण्यात येणार्‍या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच न्यायालयाने नकार दिला. मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या सर्वेक्षणाच्या आदेशाविरुद्धच्या मुसलमान पक्षाकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.

किल्ल्यांच्या संवर्धनासाठी खासगी संस्थांचे साहाय्य घेण्यासाठी गोवा सरकार कायद्यात सुधारणा करण्याच्या सिद्धतेत !

सरकार किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी कायद्यात पालट करण्याचा विचार करत आहे. उपाहारगृहांसमवेत मद्यालये चालू होणार नाहीत, याची काळजी घेऊन ऐतिहासिक किल्ल्यांचे पावित्र्य टिकवणे आवश्यक आहे !

Tajmahal Shiva Temple : ताजमहाल हे शहाजहानच्या आधीपासून अस्तित्वात असून ते तेजोमहालय आहे !

‘योगेश्‍वर श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संघ ट्रस्ट’चा न्यायालयात दावा

पुणे महापालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे शनिवारवाड्याची दुरवस्था !

मराठ्यांच्या इतिहासाची साक्ष देणारा शनिवारवाडा पुणे महापालिका सुस्थितीत ठेवू न शकणे, हे इतिहासाचा अभिमान नसल्याचेच द्योतक !

महाराष्ट्रातील मंदिरांच्या जीर्णोद्धाराच्या कामात भारतीय पुरातत्व विभागाकडून आडकाठीचा प्रयत्न !

मंदिरांच्या जीर्णोद्धाराच्या कामात अडथळा आणणारा भारतीय पुरातत्व विभाग अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांच्या कामात अडथळे आणण्याचे धाडस करत नाही, हे लक्षात घ्या ! याविषयी आता समस्त हिंदूंनी वैध मार्गाने आवाज उठवायला हवा !