वणी (यवतमाळ) तालुक्यातील मंदर गावाजवळ सातवाहन काळातील सापडले मोठे शहर !

सातवाहनांच्या राजवटीत महाराष्ट्रात सुवर्णकाळ होता. या साम्राज्याचा राजा सिमुक सातवाहन हाच या साम्राज्याचा संस्थापक मानला जातो.

Vitthal Mandir Water Leakage : पहिल्याच पावसाळ्यात पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात गळती !

यावरून मंदिराचे जे संवर्धनाचे काम झाले, ते निकृष्ट होते, असाच विचार भाविकांच्या मनात येत आहे. यास उत्तरदायी असलेला पुरातत्व विभाग आणि प्रशासन यांच्यातील संबंधितांवर कारवाई करणे आवश्यक !

Bhojshala : खांबांवर दिसून आल्या देवतांच्या आकृती ! – धार (मध्यप्रदेश) येथील भोजशाळेचे सर्वेक्षण

भोजशाळा परिसरात ६० व्या दिवशीही पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण चालू आहे. १९ मे या दिवशी उत्खननाच्या वेळी एक पांढरा दगड सापडला असून त्यावर कमळाचा आकार दिसून आला आहे.

वसई येथे गडावर विवाहापूर्वीची छायाचित्रे काढण्यास बंदी !

असा निर्णय सर्वच गड-दुर्गांच्या संदर्भात घेऊन गडांचे पावित्र्य राखले गेले पाहिजे !

Shri Vitthal Rukmini Temple:गाभार्‍याचे काम १० टक्केही पूर्ण नाही, तसेच कामाच्या ठिकाणी पुरातत्व विभागाचा एकही सक्षम अधिकारी उपस्थित नाही ! – ह.भ.प. रामकृष्ण वीर महाराज

गाभार्‍यातील ग्रॅनाईट काढून मूळ स्वरूप देण्यासाठी श्री विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन बंद करण्यात आले होते; मात्र गेल्या ४५ दिवसांत केवळ ग्रॅनाईटच काढलेले आहे. गाभार्‍यातील कामाला प्राधान्य देण्यात आलेले नाही.

अहिल्यानगर येथील हरिश्चंद्र गडावरील शिवपिंडीला तडे; पुरातत्व विभागाचे संवर्धनाकडे दुर्लक्ष !

पिंडीला तडे जाऊनही पुरातत्व विभाग मंदिराकडे का दुर्लक्ष करत आहे ? पुरातत्व विभागाचे नेमके काय काम ?

गड-दुर्ग यांचे जतन आणि संवर्धन यांसाठी पुरातत्व विभाग, इतिहास अभ्यास, स्थापत्यतज्ञ आणि दुर्गप्रेमी एकत्रित !

घाटकोपर येथे राज्यस्तरीय परिषद !

Dhar Bhojshala Survey : भोजशाळेविषयी सर्वेक्षणाला इंदूर उच्च न्यायालयाकडून २ महिने मुदतवाढ !

न्यायालयाने पुरातत्व विभागाला भोजशाळेच्या सर्वेक्षणाविषयी अंतिम अहवाल ४ जुलैपूर्वी सादर करण्यास सांगितले आहे.

मानेसर (हरियाणा) येथे ४०० वर्षे जुन्या भगवान श्री विष्णु आणि श्री लक्ष्मीदेवी यांच्या मूर्ती सापडल्या !

मानेसर येथील बागनकी गावात एका भूखंडावर बांधकामासाठी चालू असलेल्या खोदकामाच्या वेळी ३ प्राचीन मूर्ती सापडल्या. यातील भगवान श्रीविष्णूची दीड फूट उंचीची, श्री लक्ष्मीदेवीची एक फूट उंचीची, तर तिसरी मूर्ती शेषशायी भगवान श्री विष्णु आणि श्री लक्ष्मीदेवी यांची आहे.

धार (मध्यप्रदेश) येथील भोजशाळेचे ४० टक्के सर्वेक्षण पूर्ण

आतापर्यंत सर्वेक्षणातून अनेक मूर्ती, स्तंभ आणि हिंदूंची धार्मिक चिन्हे असलेल्या कलाकृती सापडल्या !