Cleanliness Drive : देशातील प्रत्येक मंदिरात १४ ते २२ जानेवारी या कालावधीत स्वच्छता अभियान राबवा !

‘देशभरातील नागरिकांना माझी प्रार्थना आहे की, भव्य श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या एक आठवडाआधीपासून, म्हणजे मकरसंक्रातीपासून देशातील लहान-मोठ्या मंदिरांच्या स्वच्छतेचे अभियान राबवले पाहिजे – पंतप्रधान नरेंद्र मोदी

युवकांनो, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चैतन्यदायी ग्रंथकार्याची पताका फडकत ठेवण्यासाठी ग्रंथनिर्मितीच्या सेवेत सहभागी व्हा !

ग्रंथसेवेच्या अंतर्गत संकलन, भाषांतर, संरचना, मुखपृष्ठ-निर्मिती इत्यादी विविध सेवांमध्ये सहभागी होऊ इच्छिणार्‍यांनी स्वत:ची माहिती सनातनच्या जिल्हासेवकांच्या माध्यमातून पाठवावी.

२२ जानेवारीला ‘रामज्योती’ प्रज्वलित करून दिवाळी साजरी करा ! – पंतप्रधान मोदी

हा ऐतिहासिक क्षण आपल्या आयुष्यात सुदैवाने आला आहे. मी भारताच्या १४० कोटी देशवासियांना हात जोडून प्रार्थना करत आहे. २२ जानेवारीला प्रभु श्रीराम जेव्हा श्रीराममंदिरात विराजमान होतील, तेव्हा ‘रामज्योती’ प्रज्वलित करा. दिवाळी साजरी करा. २२ जानेवारीला सर्वांना अयोध्येत येणे शक्य नाही.

उत्तरप्रदेश सरकार इस्रायलमध्ये पाठवणार बांधकाम करणारे कामगार !

उत्तरप्रदेश सरकार इस्रायलमध्ये बांधकाम करणारे कामगार पाठवणार आहे. सध्या इस्रायलला अशा कामगारांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असल्याने उत्तरप्रदेश सरकारने ही संधी साधण्याचा प्रयत्न केला आहे.

धर्मसेवा म्हणून आपल्या जिल्ह्यातील विद्यमान (हयात) संतांची माहिती कळवा !

संतांची ओळख सर्वांना व्हावी, तसेच त्या संतांची शिकवण आणि चरित्र यांतून जनसामान्यांना साधना करण्यासाठी प्रेरणा मिळावी’, या उद्देशांनी त्यांची माहिती ‘सनातन प्रभात’मधून प्रसिद्ध करणार आहोत.

भावी पिढीवर सुसंस्कार करणार्‍या सनातनच्या ‘संस्कार वह्यां’ची मागणी १०.१.२०२४ पर्यंत घ्या !

जिज्ञासू आणि धर्मप्रेमी यांनी सनातनच्या ‘संस्कार वह्यां’ची मागणी स्थानिक वितरकांकडे किंवा ९३२२३१५३१७ या संपर्क क्रमांकावर करावी.

साधकांनो, दत्तजयंतीच्या निमित्ताने लावण्यात येणार्‍या ग्रंथप्रदर्शनातून सनातनने प्रकाशित केलेली ग्रंथसंपदा सर्वदूर पोचवा !

२६.१२.२०२३ या दिवशी दत्तजयंती आहे. त्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ, लघुग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने अधिकाधिक जिज्ञासूंपर्यंत पोचवण्याची सुवर्णसंधी लाभली आहे.

धर्माभिमान आणि राष्‍ट्राभिमान वाढवणार्‍या लिखाणाची आवश्‍यकता !

धर्माभिमान आणि राष्‍ट्राभिमान वाढीस लागेल, असे लिखाण ‘सनातन प्रभात’च्‍या माध्‍यमातून वाचकांसाठी उपलब्‍ध करून देण्‍याचा मानस आहे. ते प्रकाशित करण्‍यासाठी पाठवू शकता.

कुणीही आधारकार्ड क्रमांक, ‘एटीएम् चा पिन’, ओटीपी यांसारखी गोपनीय माहिती मागितल्यास स्वतःची फसवणूक टाळण्यासाठी त्याकडे दुर्लक्ष करा !

भ्रमणभाषच्या आधारे संपर्क करून किंवा लघुसंदेश पाठवून नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढतच आहे. तात्कालिन सामाजिक समस्या, नागरिकांची अगतिकता, अज्ञानीपणा, भोळेपणा आदी कारणांनी समाजातील अनेक दुष्प्रवृत्ती लुबाडणूक करत असतात.

जुने निवृत्ती वेतन लागू करण्याचा निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेऊ ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

‘जुने निवृत्ती वेतन लागू करण्याविषयी शासन सकारात्मक असून कर्मचारी संघटनांनी संप त्वरित मागे घ्यावा’, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी या वेळी केले.