आपत्काळापूर्वी ग्रंथांच्या माध्यमातून धर्मप्रसार करून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ग्रंथनिर्मितीच्या सेवेत सहभागी व्हा !

धर्माच्या अधिष्ठानावरच ‘हिंदु राष्ट्र’ उभे रहाणार असल्याने हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी सर्वत्र धर्मप्रसाराचे कार्य होणे नितांत आवश्यक आहे. धर्मप्रसाराचे कार्य होण्यामध्ये ज्ञानशक्ती, इच्छाशक्ती आणि क्रियाशक्ती यांपैकी ज्ञानशक्तीचे योगदान सर्वाधिक आहे.

सर्वत्र आदर्श गणेशोत्सव साजरा होण्यासाठी राबवण्यात येणार्‍या मोहिमेत अधिकाधिक संख्येने सहभागी होऊन श्री गणेशाची कृपा संपादन करा !

वाचक, हितचिंतक आणि राष्ट्रप्रेमी हिंदू यांना सत्सेवेची सुवर्णसंधी !

सनातन-निर्मित सात्त्विक मूर्तीच्या संगणकीय त्रिमितीकरणाच्या सेवेत सहभागी व्हा !

आधुनिक विज्ञानाचा उपयोग सात्त्विक कलाकृतीच्या निर्मितीसाठी करणे आणि अधिकाधिक लोकांना या मूर्तीचा लाभ करून घेता यावा, या उद्देशांनी या मूर्तीची संगणकीय त्रिमितीय रचना करण्याचे नियोजिले आहे. त्यासाठी ‘ब्लेंडर’, ‘झेड्ब्रश’ अशा संगणकीय प्रणालींचे (‘सॉफ्टवेअर’चे) ज्ञान असणे आवश्यक आहे.

Extradite Sheikh Hasina : शेख हसीना यांना बांगलादेशाकडे सोपवा ! – ‘बांगलादेश नॅशनल पार्टी’

आता अशा प्रकारे आवाहन करणारा बांगलादेश नंतर भारताच्या विरोधात कारवाया चालू करील, यात शंका नाही !

सर्वत्र आदर्श गणेशोत्सव साजरा होण्यासाठी राबवण्यात येणार्‍या मोहिमेत अधिकाधिक संख्येने सहभागी होऊन श्री गणेशाची कृपा संपादन करा !

या उत्सवामधून हिंदूंचे प्रभावी संघटन आणि समाजामध्ये जागृती होण्याकरता उत्सवात होणारे अपप्रकार दूर करणे आवश्यक आहे. धर्मशिक्षण देऊन हिंदु बांधवांमध्ये जागृती करणारी हिंदु जनजागृती समिती याच उद्देशाने संघटनासाठी प्रयत्नशील आहे.

भांडुप (मुंबई) येथे १७ ऑगस्टला ‘हिंदु वेदना – श्रद्धांजली सभा’ !

भांडुप पश्चिम येथील ‘हिंदु वेदना – श्रद्धांजली सभे’ला सर्व राजकीय पक्ष, सामाजिक आणि धार्मिक संघटनांनी समस्त भांडुपकरांना आणि हिंदूंना यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

राखीपौर्णिमेला बहिणीला चिरंतन ज्ञानामृत असलेले सनातनचे ग्रंथ देऊन, तसेच राष्ट्र-धर्म यांच्याप्रती अभिमान वाढवणार्‍या ‘सनातन प्रभात’चे वाचक बनवून अनोखी ओवाळणी द्या !

भगिनीच्या मनावर साधनेचे महत्त्व बिंबवून जीवनात आमूलाग्र पालट करणार्‍या ‘सनातन प्रभात’चे तिला वाचक बनवणे आणि त्यातील अमूल्य माहिती वाचण्यास प्रवृत्त करणे, यांपेक्षा अन्य श्रेष्ठ ओवाळणी कोणती असेल ?

१५ ऑगस्ट आज स्वातंत्र्यदिन 

देश स्वतंत्र झाला, तो दिवस होता ‘श्रावण कृष्ण चतुर्दशी’ या तिथीचा ! इंग्रजाळलेल्या मानसिकतेमुळे हा दिवस ख्रिस्ती कालगणनेनुसार ‘१५ ऑगस्ट’ असल्याचे म्हटले जाते. 

धर्मरक्षणार्थ प्राणांची आहुती देणार्‍या कोट्यवधी हिंदूंसाठी १५ ऑगस्ट हा ‘श्राद्ध संकल्प दिवस’ ! – मीनाक्षी शरण, अध्यक्षा, अयोध्या फाऊंडेशन

हिंदूंवर गेली शेकडो वर्षे अनन्वित अत्याचार करण्यात आले. आजच्या जागतिक मानवसमूहाला यासंदर्भात माहिती देणे आणि या माध्यमातून आपल्या पूर्वजांमुळेच आपली हिंदु ओळख टिकून राहिली, यासाठी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची ही संधी आहे.

मिरज येथील श्रीकाशीविश्वेश्वर मंदिरात श्रीमद्भगवद्गीता आणि श्रीविष्णुसहस्रनाम पठण !

श्री माधवराव गाडगीळ मित्र परिवार आणि श्री काशीविश्वेश्वर देव ट्रस्ट यांच्या वतीने येथील श्री काशीविश्वेश्वर मंदिरात तिसरा सोमवार, १९ ऑगस्ट या दिवशी सकाळी १० ते १ या वेळेत ‘फडके महिला भजनी मंडळ’ यांचे श्रीमद्भगवद्गीता संपूर्ण १८ अध्यायपठण आणि श्री विष्णु सहस्रनामाच्या पठणाचे आयोजन करण्यात आले आहे.