मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना हिंदूंचे आवाहन
मेरठ (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशातील संभलप्रमाणेच मेरठमध्येही ४२ वर्षे जुने मंदिर सापडले आहे. मेरठमधील मुसलमानबहुल भागात शहागासा येथे पिपळेश्वर शिवमंदिर आहे, जे बंद आहे. हे मंदिर वर्ष १९८२ मध्ये बंद करण्यात आले. सध्या मंदिराच्या दुरवस्थेबद्दल बोलायचे झाले, तर ते पूर्णपणे जीर्ण अवस्थेत आहे. मंदिराजवळ एक विहीरही असून तिला प्रशासनाने कुलूप लावले आहे. मंदिराच्या वरच्या भागात जाण्यासाठी रस्ता नाही. हिंदू आजही मंदिराखालच्या बाजूलाच पूजा करतात.
मंदिराचा जीर्णोद्धार करा ! – हिंदूंची मागणी
मंदिराचा जीर्णोद्धार आणि पुनर्बांधणी व्हावी, अशी हिंदूंची इच्छा आहे. वर्षानुवर्षे ओसाड पडलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार करून येथे पूजा प्रारंभ व्हावी, अशी सर्वांचीच इच्छा आहे. लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आवाहन केले आहे की, जेव्हा अयोध्येपासून संभलपर्यंत निर्जन मंदिरे उघडण्यात येत आहेत, तेव्हा या ऐतिहासिक मंदिराचाही जीर्णोद्धार करण्यात यावा.
४२ वर्षांपूर्वी मंदिर का बंद करण्यात आले ?प्रशासनाने मंदिराला कुलूप लावले असून मंदिर उघडणे किंवा बंद करणे हा प्रशासनाचा निर्णय असल्याचे जवळच्या मुसलमानांचे म्हणणे आहे. वर्ष १९८२ मध्ये येथे आरती करतांना रामभोळे नावाच्या पुरोहिताची हत्या करण्यात आली होती. यानंतर मेरठमध्ये दंगल उसळली होती. तेव्हापासून मंदिर बंद आहे. मंदिराचे प्रकरण न्यायालयात गेले. मुसलमान पक्षकार, जे न्यायालयात गेले होते, ते आता या जगात नाहीत. न्यायालयात हिंदु पक्षाचा विजय झाला असला, तरी खटला लढणार्या हिंदु पक्षातील लोकांचाही मृत्यू झाला आहे. या कारणास्तव हे मंदिर बंद असून ते भग्नावस्थेत आहे. |