Waqf Amendment Bill 2024 : ‘वक्‍फ सुधारणा कायदा २०२४’ च्‍या संदर्भात नागरिकांनी मत पाठवण्‍याचे केंद्रशासनाचे आवाहन !

  • १० सप्‍टेंबरपर्यंतची मुदत

  • हिंदु जनजागृती समिती आणि सनातन प्रभात यांच्‍या द्वारेही जनजागृती

मुंबई – ‘एकदा वक्‍फ नेहमीसाठी वक्‍फ’(वन्‍स वक्‍फ ऑलवेझ वक्‍फ) या एका वाक्‍यातून वक्‍फ कायद्याची भयावहता स्‍पष्‍ट होते. उच्‍च न्‍यायालयाच्‍या एका न्‍यायमूर्तींनी असे विधान केले होते. हा कायदा रहित करण्‍यासाठी केंद्रशासनाने पाऊल टाकले आहे. यासाठी संयुक्‍त संसदीय समिती बनवण्‍यात आली असून जनतेला या कायद्याविषयीचे त्‍यांचे दृष्‍टीकोन पाठवण्‍याचे शासनाने आवाहन केले आहे. यासंदर्भात हिंदु जनजागृती समितीनेही एक ऑनलाईन याचिका केली असून आतापर्यंत सव्‍वा लाख हिंदूंनी त्‍याद्वारे ‘वक्‍फ कायदा, १९९५’ रहित करण्‍याची मागणी केली आहे.

‘सनातन प्रभात’नेही ऑनलाईन माध्‍यमांद्वारे  हिंदूंना त्‍यांची मते सरकार दरबारी कळवण्‍याचे जाहीर आवाहन केले आहे.

औरंगजेब किंवा निजाम यांनी कोणतीच भूमी आणली नव्‍हती, तर ती भारताचीच भूमी आहे ! – हिंदु जनजागृती समिती

श्री. रमेश शिंदे

यासंदर्भात समितीचे राष्‍ट्रीय प्रवक्‍ते श्री. रमेश शिंदे यांनी त्‍यांचा व्‍हिडिओ प्रसारित केला आहे. त्‍यात ते म्‍हणतात की, वक्‍फ कायद्याच्‍या माध्‍यमातून चालू असलेला ‘लँड जिहाद’ (भूमी जिहाद) रोखण्‍यासाठी केंद्रशासनाने ‘वक्‍फ सुधारणा कायदा २०२४’ आणला आहे. यासंदर्भात शासनाने संयुक्‍त संसदीय समितीकडे या कायद्याचा मसुदा पाठवला आहे. समितीने भारतातील सर्व नागरिकांना या कायद्याविषयीची त्‍यांची भूमिका मांडण्‍याचे आवाहन केले आहे. वक्‍फ कायद्याद्वारे आपली गावे, मंदिरे गिळंकृत होऊ द्यायची नसतील, तर हिंदूंनी त्‍यांचे मत सरकार दरबारी पाठवले पाहिजे. तमिळनाडूतील १ सहस्र ४०० वर्षे प्राचीन मंदिर, उडुपी येथील जैन मंदिर यांना वक्‍फ कायद्याद्वारे कह्यात घेण्‍याचे षड्‍यंत्र चालू आहे. ही सर्व भूमी जिल्‍हाधिकार्‍याद्वारेच वक्‍फ बोर्ड कह्यात घेत आहे. आज वक्‍फ बोर्डाकडे ८ लाख एकर भूमी असूनही त्‍याला सरकारकडून मशिदी उभारण्‍यासाठी भूमी हवी आहे. औरंगजेब अथवा निजाम यांनी कोणतीच भूमी त्‍यांच्‍यासमवेत आणली नव्‍हती. ही भूमी भारताचीच असून त्‍यावर भारत शासनाचाच अधिकार आहे. यामुळे वक्‍फ बोर्डाचे षड्‍यंत्र हाणून पाडण्‍यासाठी जगदंबिका पाल यांच्‍या नावाने संयुक्‍त संसदीय समितीकडे यांच्‍या नावाने तुमची भूमिका पाठवा !

वक्‍फ कायद्याच्‍या संदर्भातील तुमची भूमिका अशा प्रकारे पाठवा !

केंद्रशासनाने खालील पत्त्यावर जनतेने ‘वक्‍फ सुधारणा कायदा २०२४’संदर्भात त्‍यांची मते पाठवण्‍याचे आवाहन केले आहे. यामध्‍ये नागरिकांनी त्‍यांची भूमिका लिहिलेल्‍या दोन प्रती पोस्‍टाने पाठवाव्‍या.

पत्र पाठवण्‍यासाठी पत्ता :

श्री. जगदंबिका पाल, सहसचिव (जेएम), लोकसभा सचिवालय, ४४०, संसद भवन, नवी दिल्ली – ११०००१
फॅक्‍स क्रमांक : ०११ – २३०१ ७७०९

जे लिखित पत्र पाठवू शकत नाहीत, त्‍यांनी इमेलद्वारे त्‍यांचे मत कळवावे.
इमेल आयडी :  [email protected]

टीप : पोस्‍टाने प्राप्‍त झालेल्‍या प्रतिसादांना अधिक महत्त्व दिले जाईल.

हिंदु जनजागृती समितीने यासंदर्भात ऑनलाईन याचिका प्रविष्‍ट केली आहे. अनेक हिंदू या याचिकेतील मजकुराचा वापर करून सरकारला पत्र पाठवत आहेत. त्‍याची माहिती मिळवण्‍यासाठी पुढील मार्गिकेवर जा !

https://www.hindujagruti.org/waqf-board-act

संपादकीय भूमिका

हिंदूंनो, वक्‍फ कायदा हा लँड जिहादचे घटनात्‍मक रूप असून त्‍याद्वारे हिंदूंच्‍या भूमी कह्यात घेण्‍याचे षड्‍यंत्र हाणून पाडले पाहिजे. केंद्रशासनाने यासंदर्भात मते मागवली असून हिंदूंनी ‘मला त्‍याचे काय’ अशी कूपमंडूक मनोवृत्ती त्‍यागून धर्मकर्तव्‍य बजावणे आता आवश्‍यक आहे !