Khalistani Terrorist Pannun Issues New Threat : (म्हणे) ‘रशिया आणि अमेरिकेतील भारतीय राजदूत यांना धडा शिकवणार !’

अमेरिका पुरस्कृत खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याची नवी धमकी

खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिका पुरस्कृत खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याने व्हिडिओ प्रसारित करत पुन्हा धमकी दिली आहे. तो म्हणाला की,  खलिस्तान्यांच्या विरोधात मोहीम राबवण्यासाठी भारताला रशियाकडून साहाय्य मिळत आहे. रशियाने भारताला खलिस्तान्यांची गुप्त माहिती दिली आहे. अशा परिस्थितीत आमची संघटना रशियालाही लक्ष्य करेल. रशिया, तसेच अमेरिकेतील भारताचे राजदूत  विनय क्वात्रा यांना धडा शिकवला जाईल. रशियाला भारताला साहाय्य करण्याण्यापासून रोखण्यासाठी खलिस्तानी उत्तर अमेरिका, युरोपियन युनियन, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथील रशियाचे मुत्सद्दी यांवर आक्रमण करतील.

१. अमेरिकेतील भारताचे राजदूत विनय मोहन क्वात्रा हे रशियाच्या अधिकार्‍यांशी अधिक बोलत असल्याचे पन्नूचे म्हणणे आहे. क्वात्रा वॉशिंग्टनमध्ये आहेत आणि रशियाचे मुत्सद्दी आणि वाणिज्य दूत यांच्याशी समन्वय साधत आहेत. त्यांना रशियाच्या यंत्रणांकडून खलिस्तान समर्थक शिखांची माहिती मिळत आहे. या माहितीच्या आधारे शिखांना लक्ष्य केले जात आहे. विनय क्वात्रा हे भारत-रशिया युतीचा चेहरा बनत आह आहेत. क्वात्रा यांचे नाव खलिस्त्यांच्या सूचीमध्ये वरच्या क्रमांकावर आहे. त्यांनी  रशियाने भारताला पाठिंबा देणे थांबवले नाही, तर त्यांची हानी होईल.

२. गेल्या आठवड्यात खलिस्तानचे झेंडे घेऊन आलेल्या लोकांनी न्यूयॉर्क (अमेरिका) आणि टोरंटो (कॅनडा) येथील रशियाच्या वाणिज्य दूतावासांसमोर निदर्शनेही केली होती. या वेळी भारतविरोधी घोषणाबाजी देण्यात आल्या.

संपादकीय भूमिका

अमेरिकाच्या खाल्लेल्या मीठाला जागण्याचाच प्रयत्न पन्नू करत आहे, हे लक्षात येते !