Amit Shah : निवडणूक रोख्यांना दुसरा पर्याय नसल्याने आताच्या निवडणुकीत काळ्या पैशांचा वापर होत आहे ! – अमित शहा यांचा दावा

असे उत्तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत निवडणूक रोखे योजना सर्वोच्च न्यायालयाने रहित केल्याच्या प्रश्‍नावर दिले.

Assam Congress leader arrested: आसाममधील काँग्रेसचा नेता रितम सिंह याला अटक

भारताचे गृहमंत्री अमित शहा यांचा बनावट व्हिडिओ शेअर केल्याच्या प्रकरणी आसाम पोलिसांनी काँग्रेसचा नेता रितम सिंह याला अटक केली आहे.  रितम सिंह आसाममधील काँग्रेसच्या कार्यालयातील समन्वयक आहे.

RSS Supports Reservation: रा.स्व. संघाचा आरक्षणाला पूर्ण पाठिंबा ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

मी येथे आलो, तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आरक्षणाच्या विरोधात असल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला होता. संघ आरक्षणाला विरोध करतो, हे पूर्णपणे खोटे आहे. संघ आरंभीपासूनच राज्यघटनेनुसार सर्व आरक्षणांना पाठिंबा देत आला आहे.

PM Modi Goa Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी २७ एप्रिलला गोव्यात !

वर्ष २०१९ मध्ये भाजपला दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ गमवावा लागला होता. या मतदारसंघावर भाजपने आता अधिक लक्ष केंद्रित केले आहे आणि यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे दक्षिण गोव्यात आयोजन करण्यात आले आहे.

काँग्रेसधार्जिण्या लामतिनथांग हाऊकिप याने भाजपला विरोध करतांना केले सीतामाताचे संतापजनक विडंबन !

कधी हाऊकिप अथवा त्याच्यासारख्या अन्य हिंदुद्वेष्टे काँग्रेसी इस्लाम अथवा ख्रिस्ती समाजाच्या धार्मिक भावना दुखावत नाहीत. हिंदूंमधील अतीसहिष्णुवृत्तीचा अपलाभ उठवला जात असेल, तर हिंदूंनी काय करावे ?, असा प्रश्‍न आता हिंदूंना पडला आहे !

Katchatheevu Island Issue : इंदिरा गांधी यांनी श्रीलंकेला ‘कच्चाथीवू’ हे भारतीय बेट भेटस्वरूप दिले !

पंतप्रधान मोदी यांचा गंभीर आरोप

Amit Shah On Sharia Law : मुसलमानांना शरीयत कायदा हवा असेल, तर त्यातील हात-पाय तोडण्याची शिक्षाही स्वीकारावी लागेल !

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुसलमानांना ठणकावले !

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : राज ठाकरे यांनी घेतली अमित शहा यांची भेट !; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या खासदारांसमवेत बैठक !…

या भेटीत नेमके काय बोलणे झाले याची माहिती राज ठाकरे किंवा भाजप यांच्याकडून अधिकृतरित्या देण्यात आलेली नाही. साहजिकच ही भेट लोकसभेच्या निवडणुकीची पार्श्वभूमीवर असणार.

पुत्र आणि कन्या यांच्या मोहामुळे शिवसेना अन् राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटले ! – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

आम्ही कुठलाही पक्ष फोडला नाही. पुत्र आणि कन्या यांच्या मोहामुळे शिवसेना अन् राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटले, हेच वास्तव आहे, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘इंडिया टुडे’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये केले.

JKLF Ban Extended : काश्मीरमधील फुटीरतावादी यासिन मलिक याच्या संघटनेवरील बंदीत वाढ !

काश्मीरमधील फुटीरतावादी नेता याचिन मलिक याच्या ‘जम्मू-कश्मीर लिबरेशन फ्रंट’ या संघटनेवर घालण्यात आलेल्या बंदी केंद्र सरकारने आणखी ५ वर्षांसाठी वाढवली.