कोल्हापूर – विश्व हिंदु परिषद-बजरंग दलाच्या वतीने आयोजित शौर्य संचलन कोल्हापूर शहरात उत्साहात पार पडले. मिरजकर तिकटी येथून प्रारंभ झालेले संचलन बिनखांबी गणेशमंदिर, महाद्वार रस्तामार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देऊन दसरा चौक येथे राजर्षी शाहू महाराज यांना मानवंदना देऊन समाप्त झाले. या संचलनात शहरातील बजरंगीसह राधानगरी, गगनबावडा, पन्हाळा, करवीर, भुदरगड तालुक्यांतूनही बजरंगी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.
या संचलनासाठी विश्व हिंदु परिषद जिल्हामंत्री श्री. अनिल दिंडे, जिल्हाध्यक्ष श्री. कुंदन पाटील, विभाग संयोजक श्री. सुरेश रोकडे, सर्वश्री विजय पाटील, अक्षय ओतारी, प्रदीप सूर्यवंशी, मातृशक्ती संयोजिका सौ. अश्विनीताई ढेरे यांसह हिंदु एकता आंदोलन, शिवसेना, हिंदु जनजागृती समिती, महाराष्ट्र मंदिर महासंघ, हिंदु महासभा, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यात सहभागी होते.