उज्जैन येथील ‘शैव महोत्सवा’त लावण्यात आलेल्या सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट !

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि रा.स्व. संघाचे सहकार्यवाह श्री. भय्याजी जोशी यांचीही भेट

अमित शहा यांच्या मध्यस्तीनंतर गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांचे बंड मागे !

राज्यात नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर विजय रूपानी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या नवीन सरकारमध्ये किरकोळ खाती मिळाल्याचा आरोप करत गुजरातचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी बंडाचा पवित्रा घेतला होता.

विकास आणि राममंदिर एकत्रच होणार ! – अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष, भाजप

केंद्र सरकार विकासासाठी काम करत आहे. त्याच वेळी राममंदिर उभारणीही मागे पडणार नाही, याची काळजी ते घेतील. बाबरी मशीद पाडल्यानंतर भाजपच्या प्रत्येक घोषणापत्रामध्ये राममंदिराचा उल्लेख होता.

राहुल गांधी देहलीतील मंदिरांमध्ये कधी का जात नाहीत ? – अमित शहा

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी जेव्हा देहलीमध्ये असतात, तेव्हा ते तेथील मंदिरांमध्ये दर्शनासाठी का जात नाहीत ? असा प्रश्‍न भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

(म्हणे) तुम्ही जितके माराल तितके आम्ही वाढू ! – अमित शहा

नवी देहली – केरळमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरकार संघ आणि भाजप कार्यकर्त्यांची हत्या करत आहे. मी सांगू इच्छितो की, तुम्ही जितके आम्हाला माराल तितका आमचा प्रसार होईल.

मुख्यमंत्री विजयन् उत्तरदायी ! – अमित शहा

राज्यात भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या १२० हून अधिक कार्यकर्त्यांची निर्घृण हत्या झाली आहे. त्याला मुख्यमंत्री विजयन् थेट उत्तरदायी आहेत, असा आरोप भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे.

अमित शहा गुजरातीमधून मराठ्यांचा इतिहास लिहिणार

छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास लोकापर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपचे अध्यक्ष श्री. अमित शहा गुजरातीमधून मराठ्यांचा इतिहास लिहिणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची सूरतेची लूट एवढेच चित्र गुजरातमध्ये रंगवले जाते.

भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या कार्यक्रमस्थळी मेलेला बैल टाकून विरोध !

हरियाणा आणि देहली येथील गायरान (गुरांना चरण्यासाठी कुरण) भूमीसाठी संत गोपालदास दोन महिन्यांपासून उपोषण करत आहेत.

न्यायालयाच्या निकालानुसार राममंदिराची उभारणी ! – अमित शहा

अयोध्येतील राममंदिराची उभारणी ही न्यायालयाच्या निकालानुसार किंवा दोन्ही बाजूंशी चर्चा केल्यानंतरच होईल. याविषयी भाजपच्या भूमिकेत कोणताही पालट झालेला नाही, असे उत्तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी याविषयी विचारण्यात आलेल्या एका प्रश्‍नाला दिले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now