पुणे – महावतार बाबाजींचा क्रियायोग हा केवळ आध्यात्मिक आणि धार्मिक आधारावरच नव्हे, तर वैज्ञानिक स्तरावरही सिद्ध झाला आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी गुरूंनी दिलेले नामस्मरण करणे अत्यंत आवश्यक आहे. आज माणूस केवळ भौतिक सुखासाठी जगत आहे. भरकटलेले जीवन योग्य मार्गावर आणण्यासाठी महावतार बाबांचे नामस्मरण करणे आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ विचारवंत आणि आयुर्वेदाचार्य डॉ. ज्योती मुंडर्गी यांनी व्यक्त केले. महावतार बाबाजींच्या १७ व्या ‘प्रेमोत्सव सोहळ्या’च्या निमित्त बाबाजींच्या चरणी विश्वकल्याण प्रार्थना आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन पुण्यातील कर्वे रस्त्याजवळील कोहिनूर मंगल कार्यालयात करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या.