|

इंफाळ (मणीपूर) – राज्यातील कांगपोकपी येथे रहाणारा काँग्रेसधार्जिणा नेता लामतिनथांग हाऊकिप याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी मणीपूर दौर्याच्या निमित्ताने ‘एक्स’वरून एक पोस्ट केली होती. त्यामध्ये त्यांनी पंतप्रधान आणि गृहमंत्री अमित शहा यांना अनुक्रमे श्रीराम अन् लक्ष्मण यांच्या रूपात दाखवले. दोघांच्या मध्ये नग्नावस्थेतील सीतामातेला दाखवले आणि तिच्या डोक्यावर ‘मणीपूर’ असे लिहिले. यातून हाऊकिपने ३ मे २०२३ या दिवशी ख्रिस्ती कुकी असलेल्या एका महिलेवर काही हिंदूंनी केलेल्या कथित सामूहिक बलात्काराची आठवण करून दिली.

(टीप : हे चित्रे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतूने नव्हे, तर कशा प्रकारे देवतांचे विडंबन केले आहे, ते दाखवण्यासाठी प्रकाशित केली आहेत.)
या प्रकरणी राज्यातील हिंदूंमध्ये संतापाची लाट उसळली असून ते हाऊकिपला विरोध करत आहेत. हिंदूंचा वाढता विरोध पहाता हिंदुद्वेष्ट्या हाऊकिपने ती पोस्ट काढून टाकली आहे. इंफाळ येथील हिंदुत्वनिष्ठांनी ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सदर व्यक्ती ही नेहमीच हिंदू आणि त्यांच्या देवता यांच्या विरोधात लिखाण करत असते. यासह हिंदु मैतेई समाजालाही लक्ष्य करत असते. ख्रिस्ती कुकी आणि हिंदु मैतेई यांच्यामध्ये तेढ निर्माण करण्यासाठीही ही व्यक्ती कार्यरत असते.
संपादकीय भूमिका
|
६० वर्षांच्या अबरार याने ४ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून केला बलात्कार
आसामच्या माजी पोलीस उपमहानिरीक्षकांची ५३ कोटी रुपयांची संपत्ती जप्त !
Kailash Vijayvargiya On RSS : रा.स्व. संघात गर्दी वाढल्याने चांगल्या लोकांची कमतरता !
फोर्ट (मुंबई) येथील शासकीय जागेच्या प्रकरणी चर्चला जिल्हाधिकार्यांकडून थकित पैशांच्या वसुलीची नोटीस !
Ghaziabad Mazar Demolished : गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे अतिक्रमण करून बांधलेली ३ मजली मजार भुईसपाट !
इंधन बचत करा आणि सोने खरेदी मर्यादित ठेवा ! : Narendra Modi