कोल्हापूर, १५ डिसेंबर (वार्ता.) – संजय गांधी, श्रावण बाळ, वृद्धापकाळ, इंदिरा गांधी आदी शासनाच्या योजनांद्वारे नागरिकांना सानुग्रह अनुदान दिले जाते. गांधीनगर, वळीवडे, उंचगाव, रुईकर कॉलनी यांसह अन्य ४ सहस्र लोकांचे अनुदान कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत जमा होते. वयोवृद्ध, आजारी लोकांना तेथे येणे शक्य होत नाहीत, तसेच जे येतात, त्यांना मोठा व्यय करून रिक्शा करून यावे लागले. तरी या नागरिकांना शासनाच्या योजनांचे मिळणारे अनुदान उंचगाव येथे मिळावे, या मागणीचे निवेदन ठाकरे गटाच्या वतीने कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी.एम्. शिंदे यांना देण्यात आले. (अशी मागणी का करावी लागते ? – संपादक) या वेळी जिल्हाप्रमुख संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, पोपट दांगट, शरद माळी यांसह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.