पुणे येथील संगणक अभियंत्याची ७१ लाखांची फसवणूक करणार्‍या रशियन आरोपीला अटक !

अटक केलेले गुन्हेगार

पिंपरी-चिंचवड (जिल्हा पुणे) – येथील संगणक अभियंत्याची ७१ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. इन्स्टाग्रामवर आलेल्या विज्ञापनावर ‘क्लिक’ केल्यानंतर त्यांना ‘शेअर मार्केट’च्या गटात समाविष्ट करून चांगला परतावा देण्याचे आमीष दाखवून ७१ लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी सायबर पोलिसांनी गोवा राज्यातून रशियन आरोपी टोनीला अटक केली आहे. आरोपी टोनीच्या माध्यमातून सर्व सूत्रे पुणे येथे रहाणारा आरोपी श्रेयस माने बघायचा त्यालाही पोलिसांनी आधीच बेड्या ठोकल्या आहेत.

श्रेयस हा मित्रांकडून ‘गेमिंग’च्या नावाने बँक खाते आणि ‘मोबाईल लिंक’ घेऊन तो विमानाने गोव्याला जायचा. तिथे टोनीसमवेत संपर्क साधून त्याच्याकडून सायबर गुन्हे करवून घेत असल्याचे समोर आले आहे. गुन्ह्यातील रक्कम दुबई आणि इतर ठिकाणी वळवण्यात आली आहे. रशियन आरोपी टोनीचा शोध गुजरात पोलिसही घेत होते. या प्रकरणी मार्क, श्रेयस आणि टोनी तिघेजण सायबर गुन्हे करत असल्याचे उघड झाले आहे. त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे.