सोलापूर – हुतात्मा आणि उद्यान एक्सप्रेस या गाड्यांना जेऊर येथे थांबा मिळावा, अशी मागणी ‘हुतात्मा भगतसिंग प्रवासी संघटने’ने केली आहे. दिनांक १३ डिसेंबर या दिवशी जेऊर येथे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना आले होते. या वेळी मीना यांच्या हस्ते प्रथम श्रेणी आणि द्वितीय श्रेणी प्रतिक्षालयाचे उद्घाटन करण्यात आले. दिलेल्या निवेदनावर तात्काळ विचार करून लवकरात लवकर विषय मार्गी लावण्याचे आश्वासन महाव्यवस्थापक यांनी दिले. या प्रसंगी जेऊर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. करमाळा तालुक्यातील जेऊर रेल्वेस्थानक हे महत्त्वाचे स्थानक असून ‘अमृत भारत योजने’मध्ये जेऊर स्थानकाचे नाव आहे.