सनातनचे हितचिंतक आणि धर्मप्रेमी उद्योजक श्री. संजय ठाकूर यांची करणी सेनेच्या अकोला जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
हिंदूंचे संघटन करण्यासाठी देवाने मला दिलेली ही संधी आहे आणि तिचा मी पूर्ण लाभ घेण्याचा प्रयत्न करणार आहे.= श्री. संजय ठाकूर
हिंदूंचे संघटन करण्यासाठी देवाने मला दिलेली ही संधी आहे आणि तिचा मी पूर्ण लाभ घेण्याचा प्रयत्न करणार आहे.= श्री. संजय ठाकूर
शहरातून जाणार्या मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येत आहे; मात्र महामार्गाच्या दोन्ही बाजूंना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महामार्गाच्या हद्दीचे ‘नीस’ (हद्द समजण्यासाठीचे दगड) लावलेले नाहीत. त्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना अवैध बाधकामे होत असून शहर बकाल होऊ लागले आहे.
गोव्याच्या ६० व्या मुक्तीदिनानिमित्त पुढील वर्षभरातील कार्यक्रमांचे नियोजन करण्याविषयी ठेवलेली सर्वपक्षीय बैठक शासनाकडून रहित करण्यात आली आहे. काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि मगोप यांनी या बैठकीवर बहिष्कार घालणार, असे आधी सांगितले होते.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्रीमंडळात फेरपालट करून अकार्यक्षम व्यक्तींऐवजी कार्यक्षम व्यक्तींना मंत्रीपद द्यावे, अशी मागणी बंदर आणि ग्रामीण विकास मंत्री मायकल लोबो यांनी केली आहे.
गोवा शासनाकडून गोव्याचा ६० वा मुक्तीदिन सोहळा वर्षभर साजरा करण्याविषयी आम्ही सहमत नाही, असे विधान गोवा फॉरवर्ड पक्षाने केले आहे.
पौराणिक कथांमधील घटनांचा भावार्थ लक्षात न घेता केवळ बौद्धिक तर्क काढून समाजाचा बुद्धिभेद करायचा, हे बुद्धिप्रामाण्यवाद्यांचे काम आहे. त्यामुळे जनतेने शास्त्र समजून घेऊन त्यांच्या तर्कांचे खंडण केले पाहिजे अन् सणही साजरे केले पाहिजेत.
आर्थिक स्थिती बिकट असतांना आणि कोविड महामारीचे संकट असतांना पुष्कळ मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करण्याऐवजी शासनाने गोव्याच्या उत्कर्षासाठी दूरदृष्टीने नियोजन करावे.
मोपा विमानतळाकडे जाणार्या राष्ट्रीय महामार्गासाठी शासनाने कह्यात घेतलेली भूमी परत करावी, अशी मागणी करत तुळसकरवाडी गावातील लोक मोठ्या संख्येने १ डिसेंबरला रस्त्यावर आले.
सुफी इस्लामिक बोर्ड संघटनेने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या जिहादी संघटनेवर बंदी घालण्याची मागणी पंतप्रधान मोदी अन् गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून केली आहे. ‘बंदी न घातल्यास आंदोलन करू’, असेही त्यांनी म्हटले आहे.
पुणे आणि सांगली विभागात विक्रमी मतदान झाले !