सनातनचे हितचिंतक आणि धर्मप्रेमी उद्योजक श्री. संजय ठाकूर यांची करणी सेनेच्या अकोला जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

श्री. संजय रमाशंकर ठाकूर

अकोला – येथील सनातनचे हितचिंतक आणि धर्मप्रेमी उद्योजक श्री. संजय रमाशंकर ठाकूर यांची नुकतीच करणी सेनेच्या अकोला जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. संजय ठाकूर निःस्वार्थपणे करीत असलेल्या राष्ट्रहित आणि समाजहित यांच्या कार्याची नोंद घेऊन त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात येत असल्याचे त्यांच्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे.

या माध्यमातून हिंदूंचे संघटन करण्यासाठी देवाने मला दिलेली ही संधी आहे आणि तिचा मी पूर्ण लाभ घेण्याचा प्रयत्न करणार आहे, अशी प्रतिक्रिया श्री. संजय ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.