सर्वपक्षीय बैठकीवर विरोधी पक्षांचा बहिष्कार : शासनाकडून बैठक रहित

६० व्या गोवा मुक्तीदिनानिमित्तचा कार्यक्रम

पणजी, १ डिसेंबर (वार्ता.) – गोव्याच्या ६० व्या मुक्तीदिनानिमित्त पुढील वर्षभरातील कार्यक्रमांचे नियोजन करण्याविषयी ठेवलेली सर्वपक्षीय बैठक शासनाकडून रहित करण्यात आली आहे. काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि मगोप यांनी या बैठकीवर बहिष्कार घालणार, असे आधी सांगितले होते. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी १९ डिसेंबर २०२० पासून पुढे वर्षभर गोव्याचा ६० वा मुक्तीदिन सोहळा साजरा केला जाईल, अशी घोषणा केली होती. यानिमित्त आयोजित कार्यक्रमांसाठी केंद्रशासन १०० कोटी रुपयांचा निधी गोवा राज्याला देणार आहे, तसेच या सोहळ्याचे कार्यक्रम ठरवण्यासाठी राजकीय पक्ष, शिक्षणतज्ञ, इतिहासकार, पत्रकार आणि इतर यांची एक उच्चस्तरीय समिती स्थापन करावी, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटले होते.

ही बैठक आता ४ डिसेंबर या दिवशी घेण्यात येणार आहे.