२ दिवसांच्या अधिवेशनातील पहिल्या दिवशी केवळ शोकप्रस्ताव
सत्ताधारी आणि विरोधक यांनी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अधिवेशनाचा अधिकाधिक वेळ द्यावा, अशी जनतेची अपेक्षा आहे !
सत्ताधारी आणि विरोधक यांनी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अधिवेशनाचा अधिकाधिक वेळ द्यावा, अशी जनतेची अपेक्षा आहे !
मराठा आणि इतर मागासवर्गीय समाज यांच्या आरक्षणाचा प्रश्न, अतीवृष्टीमुळे झालेली शेतीची हानी, शेतीचे अन्य प्रश्न आदींवरून विरोधकांनी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधीमंडळाच्या पायर्यांवर शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली.
चीनकडून लोकशाहीचे समर्थन करणार्यांची मुस्कटदाबी चालूच !
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणार्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर लावण्यात आलेल्या दिशादर्शक आणि मार्गदर्शक फलकांवर अशुद्ध मराठी भाषेत लिखाण केले आहे. या फलकांवर मराठी व्याकरणाच्या अक्षम्य चुका आहेत. महामार्गाच्या दर्जाविषयी स्थानिक जनता, तसेच लोकप्रतिनिधी यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे…
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोव्यातील आगमनापासून ते गोवा मुक्तीलढ्यापर्यंत प्रत्येक महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांशी निगडित भूमीचे संवर्धन केले जाणार आहे. गोमंतकियांसाठी हा एक अभिमानाचा भाग असणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
शिवछत्रपतींनी पुनर्बांधणी करून घेतलेल्या आणि मराठा आरमाराच्या प्रमुख शक्तीकेंद्रापैकी एक असलेल्या ‘विजयदुर्ग’ किल्ल्याची तटबंदी अन् बुरुज यांचा भाग ढासळत असल्याचे निदर्शनास आले होते. याचे काम लवकरच चालू होणार असल्याचे खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
शक्ती कायद्याचे विधेयकात आरोपीला २१ दिवसांत शिक्षेची तरतूद आहे. यामध्ये फाशी आणि जन्मठेप या शिक्षांचाही समावेश आहे.
कोरोनामुळे आधीच सर्व नागरिक डबघाईला आले आहेत. त्यातच ही इंधन दरवाढ नागरिकांना न पेलवणारी आहे.
वन्य प्राणी मनुष्यवस्तीत येण्याच्या वाढत्या घटना लक्षात घेता यापुढे वनाधिकारी आणि पोलीस अधिकारी यांच्यातील नियमित संवाद वाढण्याची आवश्यकता आहे. या दोघांमध्ये योग्य समन्वय राहिल्यास घटनेची तीव्रता अल्प करणे शक्य आहे, असे अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्य जीव) सुनील लिमये यांनी सांगितले.
मध्यप्रदेश सरकार लव्ह जिहादविरोधी कायदा बनवत आहे. ‘धर्मस्वातंत्र्य’ असे या विधेयकाचे नाव असणार आहे.