
सिंधुदुर्ग – शिवछत्रपतींनी पुनर्बांधणी करून घेतलेल्या आणि मराठा आरमाराच्या प्रमुख शक्तीकेंद्रापैकी एक असलेल्या ‘विजयदुर्ग’ किल्ल्याची तटबंदी अन् बुरुज यांचा भाग ढासळत असल्याचे निदर्शनास आले होते. याचे काम लवकरच चालू होणार असल्याचे खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, स्वराज्यातील आरमाराचे प्रमुख शक्तीकेंद्र असलेला महत्त्वाचा हा जलदुर्ग काळाच्या ओघात विदीर्ण अवस्थेत पोहोचला असल्याचे काही शिवप्रेमींनी माझ्या लक्षात आणून दिले होते. या गडाला ऑगस्ट मासात भेट देऊन मी पाहणी केली होती, तसेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांना भेटून ‘गडाची सद्य:परिस्थिती लक्षात आणून देत लवकर तटबंदी आणि बुरुज यांचे काम चालू करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी’, अशी मागणी केली होती. त्या अनुषंगाने मुंबई पुरातत्व कार्यालयाकडून पत्र प्राप्त झाले असून लवकरच गडावर संवर्धनाचे काम चालू करण्यात येणार आहे. या कामाला देहलीतील डी.जी. पुरातत्व सर्वेक्षण कार्यालयानेही अनुमती दिली आहे.
पहिल्या १० गायींसाठी ९० टक्के, तर उर्वरित १० गायींसाठी ७५ टक्के सरकारी अनुदान
गोव्यात कॅसिनोंमधील ‘गेमिंग’ क्षेत्रात २१ वर्षांखालील व्यक्तीला प्रवेश बंदी
हवामान खात्याचा नव्हे, तर पंचांगाचा अंदाज खरा ठरला ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
लातूर विभागाच्या उपसंचालक (माहिती) पदाचा सुनील कच्छवे यांनी पदभार स्वीकारला !
Telangana School Kalma Controversy : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे हिंदु विद्यार्थ्याला गृहपाठात ‘कलमा’ पाठ करण्यास सांगणार्या शिक्षिकेला शाळेने नोकरीवरून काढले !
Rajasthan Jail Marriage : राजस्थानच्या कारागृहात जन्मठेपाची शिक्षा भोगणार्या बंदीवानांचा २२ जुलैला होणार विवाह !