कृष्णामाई महोत्सवाच्या निमित्ताने काढलेल्या फेरीला भाविकांचा प्रतिसाद !

कृष्णामाई महोत्सवाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या फेरीत सहभागी विविध मान्यवर

सांगली, ८ फेब्रुवारी (वार्ता.) – येथे होत असलेल्या कृष्णामाई महोत्सवाच्या निमित्ताने ‘श्री गणपति मंदिर ते कृष्णाघाट’ अशी फेरी काढण्यात आली. या फेरीला भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. श्री गणेश मंदिरात कलशपूजन करण्यात आले.

या निमित्ताने काठावर १ सहस्र दीप प्रज्वलित करण्यात आले, तसेच कृष्णामाईची ओटी भरण्यात आली. या प्रसंगी संयोजक श्री. महेंद्र चंडाळे, भाजपचे श्री. अविनाश मोहिते, माजी नगरसेविका सौ. उर्मिला बेलवलकर, अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे यांसह पारंपरिक वेशभूषेत भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.