खरे आणि खोटे साधू अन् संत यांविषयी जनजागृती करणारी सनातनची  ग्रंथमालिका  !

सांप्रतकाळी राष्ट्र-धर्म यांची स्थिती बिकट असल्याने ती सुधारण्यासाठी प्रयत्नशील काही संतांची उदाहरणे, त्यांचे धर्महिताचे मार्गदर्शन, तसेच खर्‍या साधू-संतांची प्रतिमा मलीन करणारी प्रसारमाध्यमे आणि त्यांना साथ देणारे शासनकर्ते, पोलीस अन् बुद्धीवादी यांचे खरे स्वरूपही या ग्रंथात दिले आहे…

३ आरोपींना १४ दिवसांची पोलीस कोठडी

मस्साजोग (बीड) येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सोनवणे यांना अटक करून ४ जानेवारीला केज येथील न्यायालयात उपस्थित करण्यात आले असता त्यांना न्यायालयाने १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

अपघातांपासून रक्षण होण्यासाठी प्रतिदिन करावयाचा नामजप तो त्रास न्यून झाल्याने आता करावयाची आवश्यकता नाही !

६ जानेवारी २०२५ पर्यंत ‘महाशून्य’ नामजप करायचा होता. या नामजपाच्या परिणामाचा आढावा घेतल्यावर ‘आता साधकांवरील अपघातांचे संकट न्यून झाले आहे’, असे आढळून आले. त्यामुळे साधकांनी यापुढे हा नामजप करण्याची आवश्यकता नाही.’

गड-दुर्ग आणि ऐतिहासिक स्थळे यांवर कायमस्वरूपी भगवा झेंडा उभारावा !

गड-दुर्ग आणि ऐतिहासिक स्थळे यांवर कायमस्वरूपी भगवा झेंडा उभारावा, अशी मागणी भाजपचे सातारा शहराध्यक्ष श्री. विकास गोसावी यांनी केली. या आशयाचे निवेदन गोसावी यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना दिले आहे.

साधकांना तात्त्विक विषयासमवेत प्रायोगिक स्तरावर मार्गदर्शन करून साधनेस कृतीप्रवण करणारी अन् मोक्षपथावर नेणारी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी स्थापन केलेली एकमेवाद्वितीय अशी ‘सनातन संस्था’ !

‘अध्यात्मात कृतीला ९८ टक्के महत्त्व असून तात्त्विक भागाला केवळ २ टक्केच महत्त्व आहे. ‘सनातन संस्था’ ही एकमेव अशी संस्था आहे, जी ‘अध्यात्म, समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्म’ अशा सर्व विषयांवर केवळ तात्त्विक स्तरावर न सांगता ‘यांतील सूत्रे कृतीत कशी आणायची ?’, याविषयी अचूक मार्गदर्शन करते. विविध माध्यमांतून आणि विविध प्रकारे संस्था साधकांसह जिज्ञासू अन् धर्मप्रेमी व्यक्तींना … Read more

साधकांनी सेवा करतांना प्रति  १-२ घंट्यांनी (तासांनी) व्यष्टी साधनेचे प्रयत्न करणे आवश्यक ! 

साधकांनी शक्यतो प्रति १ – २ घंट्यांनी चालू असलेली सेवा किंवा वैयक्तिक कामे थांबवून पुढील प्रयत्न क्रमाने करावेत. २ – ३ मिनिटे आवरण काढणे, प्रार्थना करणे, अर्ध्या मिनिटासाठी एखादा भावप्रयोग करणे, एखादी स्वयंसूचना देणे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी शोधून काढलेले ‘प्राणशक्तीवहन पद्धतीचे अद्भुत उपाय’, ही आपत्काळातील संजीवनी !

प.पू. डॉक्टरांनी सांगितले, ‘‘आता केवळ षड्चक्रांवरच उपाय करून चालणार नाहीत, तर व्यक्तीच्या शरिरातील सर्व स्थानांवर (डोक्यापासून पायाच्या तळव्यापर्यंत कुठेही) असलेला शक्तीच्या प्रवाहातील अडथळा शोधून त्यावर उपाय करावे लागतील.

विविध दृकश्राव्य माहितीपटांचे (‘व्हिडिओ’ आणि ‘ऑडिओ’ यांचे) निवेदन करण्यासाठी स्त्री आणि पुरुष (साधक) निवेदकांची आवश्यकता !  

सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात विविध दृकश्राव्य माहितीपट तयार केले जातात. या माहितीपटांचे निवेदन करण्यासाठी स्त्री आणि पुरुष निवेदकांची आवश्यकता आहे. जे साधक पूर्णवेळ आश्रमात राहून किंवा मधेमधे सुटी घेऊन आश्रमात येऊन निवेदन करण्याची सेवा करू शकतात, त्यांनी त्यांची नावे पुढील पत्त्यावर कळवावीत.

संतांनी निरपेक्षपणे जनजागृती केल्यामुळे भारतीय संस्कृती जीवित ! – मुख्यमंत्री

भारतीय संस्कृती ही जगातील सर्वांत प्राचीन संस्कृती असून संतांनी जनतेमध्ये निरपेक्षपणे जनजागृती केल्यामुळे भारतीय संस्कृती जीवित राहिली आहे. पथभ्रष्ट झालेल्या राजसत्तेला संतांच्या विचारांनी हटवल्यामुळे आपल्या संस्कृतीला कुणीही संपवू शकले नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.