‘सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात विविध दृकश्राव्य माहितीपट तयार केले जातात. या माहितीपटांचे निवेदन करण्यासाठी स्त्री आणि पुरुष निवेदकांची आवश्यकता आहे. जे साधक पूर्णवेळ आश्रमात राहून किंवा मधेमधे सुटी घेऊन आश्रमात येऊन निवेदन करण्याची सेवा करू शकतात, त्यांनी त्यांची नावे पुढील पत्त्यावर कळवावीत. निवेदनाची सेवा करू इच्छिणार्यांमध्ये पुढील गुणवत्ता असणे आवश्यक आहे.
१. निवेदकाचा चेहरा ‘फोटोजेनिक’ हवा.
२. किमान १० फूट दूरवरचे मोठ्या अक्षरातील लिखाण नीट वाचता येईल, अशी निवेदकाची दृष्टी हवी. त्याला उपनेत्र (चष्मा) नसावा. चष्मा असल्यास ‘ॲन्टीग्लेयर लेन्स’ असल्यास उत्तम !
३. निवेदकाचा आवाज सुस्पष्ट हवा. त्याचे उच्चार अन् भाषा शुद्ध असावी, तसेच आवाजात गोडवाही असावा.
४. काही निवेदनांसाठी बराच काळ बसावे लागत असल्याने पाठीचे दुखणे इत्यादी शक्यतो नसावे.
५. निवेदक विविध भाषांपैकी, उदा. मराठी, हिंदी, कन्नड, इंग्रजी इत्यादी भाषांपैकी ‘कोणत्या भाषांत निवेदन करू शकतात’, याची माहिती पाठवावी.
इच्छुकांनी प्रथम स्वत:ची रंगीत छायाचित्रे आणि शक्य असल्यास आवाज ध्वनीमुद्रित करून पुढील पत्त्यावर पाठवावा. जे केवळ ध्वनी-निवेदन (ऑडिओ) करू शकतात, अशांनीही स्वत:ची नावे पाठवावीत.
नाव आणि संपर्क क्रमांक
सौ. भाग्यश्री सावंत (७०५८८८५६१०)
संगणकीय पत्ता : [email protected]’
– श्री. वीरेंद्र मराठे, व्यवस्थापकीय विश्वस्त, सनातन संस्था. (२३.१२.२०२४)