पुणे येथे शिक्षिकेकडून विद्यार्थ्यावर शारीरिक अत्याचार !

अशा इंग्रजी माध्यमांच्या शाळेतील मुलांवर काय संस्कार होणार ? समाजातील नीतीमत्ता किती खालच्या स्तराला गेली आहे याचे हे उदाहरण !

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील विश्रामगृह लग्नाच्या वर्‍हाडासाठी दिले

विद्यापिठातील विश्रामगृहाचा वापर स्वत:च्या लाभासाठी करणारे प्राध्यापक आणि कुलगुरु यांच्यावर राज्य सरकारने कारवाई करणे आवश्यक आहे !

दक्षिण गोव्यातील ४ तालुक्यांचा तिसरा जिल्हा होणार

गोवा सरकारने काणकोण, सांगे, धारबांदोडा आणि केपे या दक्षिण गोव्यातील ४ तालुक्यांचा मिळून राज्यासाठी तिसरा जिल्हा सिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर संमतीसाठी मांडला जाणार आहे.

शॅकच्या मालकाला धमकावणार्‍या तोतया सनदी अधिकार्‍याला अटक

तोतया भारतीय प्रशासकीय (सनदी) अधिकारी बनून कळंगुट भागातील शॅकच्या मालकांना धमकावणार्‍या ओडिशा येथील मनोज कुमार (वय ३१ वर्षे) या अभियंत्याला पोलिसांनी अटक केली आहे.

कणकवली येथे वारकरी मेळावा आणि ‘संतसेवा पुरस्कार’ प्रदान सोहळा

सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाच्या वतीने २९ डिसेंबरला शहरातील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान येथे  वारकरी मेळावा आणि ‘संतसेवा पुरस्कार’ वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता.

बांदा सीमा तपासणी नाका बांधकामाच्या प्रकरणी १२ वर्षांनंतर महसूल विभागाला जाग  !  

मुंबई-गोवा महामार्गावर तालुक्यातील सटमटवाडी, बांदा येथील सीमा तपासणी नाका बांधण्यात आला आहे. यासाठीचा ‘अकृषक’ (एन्.ए. – नॉन ॲग्रिकल्चर) भूमी कर आणि तो कर वेळेत न भरल्याने आकारण्यात आलेला दंड

धारगळ (गोवा) येथील ‘सनबर्न’मध्ये उपस्थित राहिलेल्या देहली येथील युवकाचा मृत्यू

धारगळ येथे चालू असलेल्या ‘सनबर्न’ इलेक्ट्रॉनिक डान्स फेस्टीव्हल’ला उपस्थित राहिलेल्या देहली येथील एका युवकाचा म्हापसा येथील एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. संबंधित युवकाचा अमली पदार्थाच्या अतीसेवनाने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

गोव्यात रेव्ह पार्ट्यांसाठी आणला जाणारा २ कोटी रुपयांचा अमली पदार्थ देहली येथे कह्यात

ख्रिस्ती नववर्षाच्या स्वागताप्रीत्यर्थ गोव्यात होणार्‍या रेव्ह पार्ट्यांसाठी आणले जाणारे २ कोटी रुपये किमतीचे ‘मलाना क्रिम’ (चरस) हा अमली पदार्थ पोलिसांनी देहली येथे कह्यात घेतला आहे.

कुठे शास्त्रज्ञ, तर कुठे भारतीय ऋषि-मुनी ! 

‘कुठे परग्रहावर जाणारे यान शोधले की, विज्ञानाचे कौतुक करणारे बुद्धीप्रामाण्यवादी, तर कुठे सूक्ष्म देहाने विश्वातच नाही, तर सप्तलोक आणि सप्तपाताळ यांतही क्षणार्धात सूक्ष्मातून जाऊ शकणारे ऋषि-मुनी !’