सेवेची तळमळ असणारी आणि साधकांना सेवेत साहाय्‍य करणारी फोंडा (गोवा) येथील कु. वैदेही राजेंद्र शिंदे (वय ३१ वर्षे) !

मी कु. वैदेहीसमवेत भौतिकोपचारांशी (फिजिओथेरपीशी) संबंधित सेवा करत होते. मला या सेवेचा प्रत्‍यक्ष अनुभव नव्‍हता. वैदेहीने मला सेवा करतांना पुष्‍कळ साहाय्‍य केले. त्‍यामुळे मला सेवा करण्‍यास प्रोत्‍साहन मिळाले आणि माझा आत्‍मविश्‍वास वाढला.

महाराष्‍ट्रात २८८ पैकी केवळ ६ मतदारसंघांत ८० टक्‍क्‍यांहून अधिक मतदान !

महाराष्‍ट्र विधानसभेसाठी मतदान झालेल्‍या २८८ पैकी केवळ ६ मतदारसंघांमध्‍ये ८० टक्‍क्‍यांहून अधिक मतदान झाले. यामध्‍ये करवीर (कोल्‍हापूर) – ८४.९६, कागल (कोल्‍हापूर) – ८२.११, सिल्लोड (नाशिक) – ८०.०८, चिमूर (चंद्रपूर) – ८१.९५, ब्रह्मापुरी (चंद्रपूर) – ८०.५४ आणि नवापूर (नंदुरबार) येथे ८१.१५ टक्‍के मतदान झाले.

महाराष्‍ट्रात ६ कोटी ४० लाख ८८ सहस्र जणांनी केले मतदान !

निवडणूक आयोगाने महाराष्‍ट्र विधानसभेचे एकूण मतदान ६५.११ टक्‍के झाल्‍याचे यापूर्वी घोषित केले होते; मात्र तपशीलवार मोजणी केल्‍यानंतर मतदानाची एकूण टक्‍केवारी ६६.०५ असल्‍याचे निवडणूक आयोगाकडून घोषित करण्‍यात आले आहे.

दैनिक ‘सनातन प्रभात’ ने लगेच वस्तुस्थिती समाज समोर आणली ! – रावसाहेब देसाई, राष्ट्राध्यक्ष, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्‍या संदर्भात सरोज पाटील यांनी जे चुकीचे वक्‍तव्‍य केले आहे त्‍या संदर्भात दैनिक ‘सनातन प्रभात’ने याची लगेच नोंद घेऊन अग्रलेख लिहून पू. गुरुजींचे कार्य आणि वस्‍तूस्‍थिती समाजासमोर आणली.

मक्केत मक्केश्‍वर महादेव आहे ! – शंकराचार्य जगद्गरु स्वामी निश्‍चलानंद सरस्वती

मक्केत मक्केश्‍वर महादेव आहे. ‘गीता प्रेस’च्या शिवपुराण अंकात याविषयी तपशीलवार लिहिले आहे; परंतु मक्का आणि मदिना ही मुसलमानांची तीर्थक्षेत्र झाली आहेत. येथे हिंदूंना जाण्यास बंदी घातली आहे. त्यावरूनच आता मुसलमानांना महाकुंभाच्या ठिकाणी प्रवेश करण्यावर बंदी घालण्याची मागणी होत आहे.

रशियाच्या आंतरखंडीय क्षेपणास्त्र आक्रमणानंतर युक्रेनची संसद बंद

रशियाने युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्त्रे डागल्यानंतर युक्रेनची संसद बंद करण्यात आली आहे. खासदारांना त्यांच्या कुटुंबियांना कीव शहरापासून दूर ठेवण्यासही सांगण्यात आले आहे.

मुसलमान जोडप्यांना विवाहाचे प्रमाणपत्र देण्याच्या वक्फ बोर्डाच्या अधिकारावर कर्नाटक उच्च न्यायालयाची स्थगिती

न्यायालयाने सांगितले की, वक्फ बोर्ड किंवा अधिकारी यांनी दिलेले विवाह प्रमाणपत्र कोणत्या अधिकृत हेतूसाठी वैध प्रमाणपत्र म्हणून वापरले जाऊ शकते ?, हे समजणे कठीण आहे.

कडेगाव (जिल्‍हा सांगली) येथील ‘म्‍यानमार केमिकल’ आस्‍थापनातून विषारी वायूगळतीने २ महिलांचा मृत्‍यू !

जिल्‍ह्यातील कडेगाव तालुक्‍यातील शाळगाव बोंबाळेवाडी येथील औद्योगिक वसाहतमधील (एम्.आय.डी.सी.) म्‍यानमार केमिकल आस्‍थापनातून मोठ्या प्रमाणावर विषारी वायूगळती झाल्‍याने २ महिलांचा मृत्‍यू झाला असून अनेक जण गंभीर घायाळ झाले आहेत.

 प्रत्येक भारतियाने ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपट पाहिला पाहिजे ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

गुजरातमध्ये वर्ष २००२ मध्ये गोध्रा रेल्वे स्थानकावर आलेल्या ‘साबरमती एक्सप्रेस’मधील कारसेवकांनी भरलेल्या डब्याला मुसलमानांनी आग लावली होती. यात ५८ कारसेवकांचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता.

प.पू. भक्‍तराज महाराज यांच्‍या निर्वाण दिनाच्‍या निमित्ताने कांदळी (जिल्‍हा पुणे) येथील आश्रमात विशेष कार्यक्रम 

प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही इंदूर (मध्‍यप्रदेश) येथील थोर संत आणि सनातनचे श्रद्धास्‍थान प.पू. भक्‍तराज महाराज यांचा महानिर्वाण दिन २४ नोव्‍हेंबर म्‍हणजे कार्तिक कृष्‍ण नवमी या दिवशी आहे.