हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. हर्षद खानविलकर यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधकांकडून करून घेत असलेल्या साधनेचे महत्त्व लक्षात येणे

‘समाजालाही साधनेची किती आवश्यकता आहे आणि समाजाकडून साधना करून घेण्यासाठी आपणही किती प्रयत्न करायला पाहिजेत, जेणेकरून धर्म यांची समाजही निर्भय बनेल अन् समाज आणि राष्ट्र यांचाही योग्य दिशेने उद्धार होईल’, असे मला वाटले.

कुटुंबियांना साधनेचे महत्त्व पटवून देऊन त्यांना तळमळीने साधनेस प्रवृत्त करणारे बांदोडा (गोवा) येथील श्री. दीपक छत्रे !

मी पूर्णवेळ साधना करायचे ठरवले. तेव्हा अनेक नातेवाइक आणि ओळखीचे यांनी मला विरोध केला; परंतु वडिलांनी मला संपूर्ण पाठिंबा दिला. अजूनही ते मला साधनेसाठी सर्वतोपरी साहाय्य करतात.  

सात्त्विकतेची ओढ असलेली सनीवेल (कॅलिफोर्निया), अमेरिका येथील चि. मीरा मयूर अवघडे (वय १ वर्ष) !

प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र आणि ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथाच्या मुखपृष्ठावरील प.पू. गुरुदेवांचे छायाचित्र पाहून ती पुष्कळ आनंदी होते. तिला बोलता येत नसूनही ती त्या छायाचित्रांकडे बघून बोलायचा प्रयत्न करते’, हे पाहून मला पुष्कळ आश्चर्य वाटते. 

‘शिबिरा’साठी आलेल्या साधिकेला चैतन्यमय अशा रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आलेल्या अनुभूती !

फेब्रुवारी २०२४ मध्ये रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात एक ‘शिबिर’ पार पडले. त्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत. 

पू. अशोक पात्रीकर यांच्या सत्संगात साधिका करत असलेल्या नामजपात पालट होऊन तिचा ‘परम पूज्य’, असा नामजप आपोआप होऊ लागणे आणि आनंदाची अनुभूती येणे

सनातनचे संत पू. अशोक पात्रीकरकाका, मी आणि चालक-साधक एका जिज्ञासूला भेटण्यासाठी जात होतो. त्या वेळी मी ‘ॐ ॐ श्री दुर्गादेव्यै नमः ॐ ॐ ।’, हा नामजप करत होते. गाडीत पुष्कळ ऊन आल्याने पू. काका मागे येऊन शेजारी येऊन बसल्यावर माझ्या नामजपात आपोआप पालट होऊन माझा ‘परम पूज्य, परम पूज्य’, असा नामजप होऊ लागला…

म्हातारपणी देवाचे नाव आठवण्यासाठी तरुणपणातच नामस्मरणाचा संस्कार मनावर करणे आवश्यक असणे 

‘म्हातारपणी विस्मरणामुळे काहीच आठवत नाही. त्यामुळे त्या वेळी देवाचे नाव तरी कसे आठवणार ? यासाठी नामस्मरणाचा संस्कार मनावर होण्यासाठी तरुणपणापासूनच अधिकाधिक नामस्मरण करावे. जेणेकरून म्हातारपणी देवाचे नामस्मरण करणे सुलभ होईल.’ 

पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी यांच्या आजारपणात नामजपादी उपाय करतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन

सनातनच्या संत पू. (श्रीमती) निर्मला दाते या सध्या गंभीर आजारी असून त्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात रहात आहेत. आधुनिक वैद्य त्यांच्यावर औषधोपचार करत आहेत. याचसमवेत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पू. आजींसाठी नामजपादी उपाय केले, या नामजपादी उपायांच्या वेळी त्यांनी केलेले मार्गदर्शन आणि काही प्रश्नोत्तरे येथे पाहूया.  

व्यष्टी-समष्टी आणि समष्टी-व्यष्टी स्तरांवरील ज्ञान

सगुण तत्त्वाकडून मिळणारे ज्ञान मर्यादित असल्याने ते अधिक प्रमाणात व्यक्तीशी संबंधित असते आणि निर्गुण तत्त्वाकडून मिळणारे ज्ञान अधिक व्यापक असल्याने ते विशिष्ट व्यक्तीशी अल्प प्रमाणात निगडित असते आणि समाज, राष्ट्र, धर्म अन् विश्व यांच्याशी अधिक प्रमाणात संबंधित असते.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात नामजप करतांना साधिकेला आलेली अनुभूती

३ ते ७.२.२०२४ या कालावधीत मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवेसाठी आले होते. त्या वेळी ध्यानमंदिरात नामजप करतांना मला आलेली अनुभूती येथे दिली आहे.