छत्रपती संभाजीनगर – सूरत येथून एका टॅ्रव्हल्समधून आणलेल्या एकूण १ सहस्र ७०० कुत्ता गोळ्या, नशेच्या अन्य १० औषधी साठ्यांसह जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी सय्यद सलमान सय्यद सऊद, अकबर सलीम शेख, माजीस युनूस बेग या ३ धर्मांधांना अटक करण्यात आली आहे. सूरत येथून आलेल्या आर्.आर्. आस्थापनाच्या टॅ्रव्हल्स बसमध्ये ३ धर्मांधांच्या बॅगांमध्ये या गोळ्या सापडल्या. (लोकसंख्येत अल्पसंख्य धर्मांध गुन्हेगारीत मात्र आघाडीवर ! – संपादक)
या गोळ्यांचे मूळ नाव नायट्रोसून-टेन असे आहे; मात्र नशेच्या बाजारात कुत्ता गोळी म्हटले जाते. गोळी घेतल्यानंतर तिचा थेट मेंदूवर परिणाम होतो. परिणाम शरीर सुन्न पडण्यासह झोप येते. आधुनिक वैद्यांच्या सल्ल्याविना या गोळ्या घेण्यास अनुमती नाही.