शिवसेनेच्या ४५ उमेदवारांची नावे घोषित !

बंड केलेल्या सर्वांना उमेदवारी !

मुंबई – विधानसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने २२ ऑक्टोबरला रात्री विलंबाने ४५ उमेदवारांची नावे घोषित केली आहेत. यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड करणार्‍या ४० आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.

बंड केलेल्या शिवसेनेच्या ४० आमदारांनी वर्ष २०१९ मध्ये ज्या मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती, त्याच मतदारसंघातून त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. मुंबईमध्ये भायखळा येथे लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या सौ. यामिनी जाधव यांना शिवसेनेकडून विधानसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. जोगेश्वरी (पूर्व) मतदारसंघामध्ये शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांची पत्नी मनीषा वायकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर मतदारसंघातून उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे.