मुंबई – हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी हत्या प्रकरणी मुंबई गुन्हेगारी जगतातील कुख्यात गुन्हेगार छोटा राजन याला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन संमत झाला आहे. या प्रकरणी झालेल्या जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती मिळाली आहे. या शिक्षेला राजन याने याविरोधात याचिका केल्याने त्याचा निकाल लागेपर्यंत या शिक्षेला स्थगिती राहील. वर्ष २००१ मध्ये शेट्टी याची खंडणीसाठी हत्या करण्यात आली होती. छोटा राजन सध्या गुन्हेगारी क्षेत्रातील वृत्त गोळा करणारे वरिष्ठ पत्रकार जे.डे. हत्या प्रकरणात देहलीतील तिहार कारागृहात शिक्षा भोगत आहे.