मुंबई – बँकॉकहून मुंबईत आलेल्या विमानातून सीमाशुल्क विभागाने ४ हॉर्नबिल, म्हणजेच धनेश पक्षी कह्यात घेतले आहेत. या प्रकरणी २ भारतीय प्रवाशांना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. या प्रवाशांनी बेकायदा पद्धतीने या पक्ष्यांची वाहतूक केली. कह्यात घेण्यात आलेले धनेश पक्षी हे संकटग्रस्त प्रजातींमधील आहेत. विमानातील सामानकक्षात सीमाशुल्क विभागातील अधिकार्यांना काही संशयास्पद बॅगा आढळल्या. चॉकलेटच्या २ पिशव्यांमध्ये प्लास्टिकचे मोठे डबे आढळून आले. अधिकार्यांना त्यात वरील पक्षी सापडले. या पक्ष्यांना पुन्हा बँकॉकला रवाना करण्यात आले आहे.