मुंबईत अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून पळणार्‍या जुबेर शाह याला नागरिकांनी पकडले !

नागपाडा येथे रस्त्यावर कर्णफुले आणि बांगड्या विकणार्‍या जुबेर शाह (वय ४५ वर्षे) याने त्याच्याकडील साहित्य पहाण्यासाठी उभ्या असलेल्या ८ वर्षीय मुलीचा विनयभंग केला.

इक्बालसिंह चहल यांची गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवपदी नियुक्ती 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहविभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून कार्यभार सांभाळतील, तसेच खनिकर्म विभागाचा अतिरिक्त कार्यभारही चहल यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

२४ ऑगस्ट या दिवशी महाविकास आघाडीकडून ‘महाराष्ट्र बंद’ची घोषणा

महिला आणि युवती यांच्यावरील अत्याचारांच्या वाढत्या घटनांच्या निषेधार्थ नागरिकांनी या राज्यव्यापी बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन महाविकास आघाडीकडून करण्यात आले आहे.

‘आय्.टी.आय्.’सह मुंबई उपनगरांतील महाविद्यालयांत युवतींना स्वसंरक्षण प्रशिक्षण देणार ! – मंगलप्रभात लोढा, पालकमंत्री

सप्टेंबर २०२४ पासून हे प्रशिक्षण चालू करण्यात येणार आहे. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील एका कार्यक्रमाच्या वेळी २१ ऑगस्ट या दिवशी मंगलप्रभात लोढा यांनी ही माहिती दिली.

Teesta Water Dispute : (म्‍हणे) ‘तिस्‍ता नदीचे पाणी न मिळाल्‍यास आंतरराष्‍ट्रीय मंचाकडे जाऊ !’ – बांगलादेशातील अंतरिम सरकारची भारताचा धमकी

हा प्रारंभ असून यापुढे बांगलादेशाकडून अशीच भाषा ऐकायला मिळणार आहे, हे भारताने लक्षात घेऊन त्‍याला जन्‍माची अद्दल घडवण्‍यासाठी सिद्ध व्‍हावे !

Badlapur Sexual Assault : शाळांमध्‍येच मुली सुरक्षित नसतील, तर शिक्षणाच्‍या अधिकाराचा उपयोग काय ? – मुंबई उच्‍च न्‍यायालय

बदलापूर (जिल्‍हा ठाणे) येथील लैंगिक अत्‍याचारप्रकरणी न्‍यायालयाने पोलीस आणि सरकार यांना फटकारले !

मुंबईत हिंदु मुलींचे चित्रीकरण करणार्‍या धर्मांधास चोप

अशा धर्मांधांना कठोरात कठोर शिक्षा केल्यासच असे प्रकार थांबतील !

Bangladesh Hindu Crisis : ढाका विद्यापिठाच्‍या वसतीगृहातील ३ सहस्र हिंदु विद्यार्थी भीतीच्‍या छायेत !

बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणे थांबली, असे सांगितले जात असले, तरी वस्‍तूस्‍थिती तशी नाही आणि ती सामान्‍य होईल, अशी शक्‍यताच नाही, हे लक्षात घ्‍या !

Atala Devi Temple : जौनपूर (उत्तरप्रदेश) येथील कथित अटाला मशीद, हे अटाला देवी मंदिर ! – पुरातत्व विभाग

अटालामाता मंदिर प्रकरणाची २१ ऑगस्टला दिवाणी न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणी न्यायालय २ सप्टेंबर २०२४ या दिवशी निर्णय देणार आहे. हिंदु पक्षाच्या अधिवक्त्यांनी न्यायालयाला सांगितले की, भारतीय पुरातत्व विभागाचे पहिले महासंचालक अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी त्यांच्या अहवालात अटाला मशिदीचे वर्णन ‘अटाला देवी मंदिर’ असे केले आहे.

छत्तीसगड आणि ओडिशा येथे कट्टर नक्षलवादी महिलेचे आत्‍मसमर्पण !

महाराष्‍ट्रासह छत्तीसगड आणि ओडिशा येथे नक्षलवादी कारवाया करणारी कट्टर महिला नक्षलवादी संगीता पुसू पोदाडी उपाख्‍य सोनी उपाख्‍य सरिता उपाख्‍य कविता (वय ४० वर्षे) हिने आत्‍मसमर्पण केले आहे.