
मुंबई – नागपाडा येथे रस्त्यावर कर्णफुले आणि बांगड्या विकणार्या जुबेर शाह (वय ४५ वर्षे) याने त्याच्याकडील साहित्य पहाण्यासाठी उभ्या असलेल्या ८ वर्षीय मुलीचा विनयभंग केला. २० ऑगस्ट या दिवशी ही घटना घडली. आजूबाजूच्या महिलांनी हा प्रकार पाहिल्यावर त्या जुबेरवर ओरडल्या. त्या वेळी जुबेर याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. या वेळी नागरिकांनी जुबेर याला पकडून पोलिसांच्या कह्यात दिले. जुबेर शहा या शीव येथील रहाणारा असून तो नागपाडा येथे किरकोळ साहित्याची विक्री करण्यासाठी आला होता. मुलीच्या पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी जुबेर शाह याला अटक केली असून त्याच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
हिंदू युवतींनी अबला न होता दुर्गेचे रूप धारण करावे ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
आषाढी वारीत नियमबाह्य आणि मनमानी भाडे आकारणीवर कडक कारवाई !
वटपौर्णिमेनिमित्त ठाणे जिल्ह्यातील श्री मलंगगडावर मलंगनाथांच्या समाधीची भक्तीभावाने आरती !
पावसाचा जोर अल्प असल्याने धरणातील पाणीसाठा गतवर्षीच्या तुलतेन अल्पच
आरोपींच्या कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ !
शिक्षणमंत्र्यांच्या त्यागपत्राच्या मागणीसाठी विरोधकांचा विधान परिषदेत गदारोळ !