Bangladesh Hindu Crisis : ढाका विद्यापिठाच्‍या वसतीगृहातील ३ सहस्र हिंदु विद्यार्थी भीतीच्‍या छायेत !

वसतीगृहातून बाहेर पडण्‍यास वाटते भीती !

छायाचित्र सौजन्य : Zee News

नवी देहली – बांगलादेशात शेख हसीना सरकार उलथून टाकण्‍याचे केंद्र ढाका विद्यापीठ होते. येथूनच विद्यार्थ्‍यांच्‍या आंदोलनाला प्रारंभ झाला; पण आजही ढाका विद्यापिठाच्‍या संकुलात ३ सहस्रांहून अधिक हिंदु विद्यार्थी इतके घाबरलेले आहेत की, ते बाहेर जाऊ शकत नाहीत. एक प्रकारे ते येथेच बंदीवान झाल्‍यासारखे आहेत, अशी माहिती ‘झी न्‍यूज’ने दिली आहे. ‘झी न्‍यूज’च्‍या प्रतिनिधीने या विद्यापिठाला भेट दिल्‍यावर ही माहिती समोर आली.

‘बांगलादेशातील हिंदु विद्यार्थ्‍यांनी शेख हसीना सरकारच्‍या विरोधात झालेल्‍या आंदोलनात भाग घेतला होता. आज ते म्‍हणत आहेत की, त्‍याच्‍या जिवाला धोका आहे. ज्‍या आंदोलनाचे आरक्षणविरोधी म्‍हणून वर्णन केले जात होते ते आता हिंदुविरोधी झाले आहे’, असे हिंदु विद्यार्थी म्‍हणत असल्‍याचे वृत्त झी न्‍यूजने प्रसारित केले आहे.

ठाकूरगावातील हिंदूबहुल गावांवर प्रत्‍येक रात्री होत आहेत आक्रमणे !

ठाकूरगावच्‍या नापीतपाड्यात जिहादी मुसलमानांनी अनेक हिंदूंची घरे जाळली. जिहाद्यांच्‍या मोठ्या जमावाने नापितपाडा गावात हिंदूंच्‍या घरांना लक्ष्य केले. हे गाव हिंदूबहुल होते. ठाकूरगावातील हिंदूबहुल गावांमध्‍ये जवळपास प्रत्‍येक रात्री आक्रमणे केली जात आहेत. जिहादी मुसलमान प्रत्‍येक रात्री हिंदूंची १० ते १५ घरे जाळत आहेत.

संपादकीय भूमिका

बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणे थांबली, असे सांगितले जात असले, तरी वस्‍तूस्‍थिती तशी नाही आणि ती सामान्‍य होईल, अशी शक्‍यताच नाही, हे लक्षात घ्‍या !