मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अपर मुख्य सचिव असलेले आणि आयएएस् अधिकारी इक्बालसिंह चहल यांना गृहविभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहविभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून कार्यभार सांभाळतील, तसेच खनिकर्म विभागाचा अतिरिक्त कार्यभारही चहल यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.