सर्वत्र आदर्श गणेशोत्सव साजरा होण्यासाठी राबवण्यात येणार्‍या मोहिमेत अधिकाधिक संख्येने सहभागी होऊन श्री गणेशाची कृपा संपादन करा !

वाचक, हितचिंतक आणि राष्ट्रप्रेमी हिंदू यांना सत्सेवेची सुवर्णसंधी !

सनातन-निर्मित सात्त्विक मूर्तीच्या संगणकीय त्रिमितीकरणाच्या सेवेत सहभागी व्हा !

आधुनिक विज्ञानाचा उपयोग सात्त्विक कलाकृतीच्या निर्मितीसाठी करणे आणि अधिकाधिक लोकांना या मूर्तीचा लाभ करून घेता यावा, या उद्देशांनी या मूर्तीची संगणकीय त्रिमितीय रचना करण्याचे नियोजिले आहे. त्यासाठी ‘ब्लेंडर’, ‘झेड्ब्रश’ अशा संगणकीय प्रणालींचे (‘सॉफ्टवेअर’चे) ज्ञान असणे आवश्यक आहे.

साधनेच्या प्राथमिक टप्प्यात अध्यात्माची तात्त्विक माहिती देणारे आणि पुढच्या टप्प्यात प्रत्यक्ष साधना करण्यास शिकवणारे सनातनचे ग्रंथ !

अध्यात्माविषयीच्या तात्त्विक माहितीचे वरील महत्त्व बघितले, तरी याचा अर्थ ‘आयुष्यभर अध्यात्माचा अभ्यास केला पाहिजे’, असे नाही. या माहितीला केवळ २ टक्के महत्त्व असते आणि प्रत्यक्ष साधना करण्याच्या कृतीला ९८ टक्के महत्त्व असते,

महिला अत्याचाराची शृंखला…नाशिक येथील खासगी शिकवणीवर्गातील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसमवेत अश्लील चाळे !

स्त्रियांवरील अत्याचार थांबण्यासाठी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राविना पर्याय नाही ! आरोपीला कठोर शिक्षा झाल्यास अशी विकृत कृत्ये करण्याचे कुणी धाडस करणार नाही !

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या रकमेत भविष्यात प्रत्येक महिन्याला वाढ करू ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’मुळे महिलांच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळत असून त्यांचे अर्थकारण अधिक बळकट होत आहे. ही योजना बंद तर होणारच नाही, उलट भविष्यात या योजनेतील प्रत्येक महिन्याला मिळणार्‍या रकमेत वाढ करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

गणेशोत्सव मिरवणुकीवर घातलेले निर्बंध शिथिल करा ! – शिवसेना शिष्टमंडळाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

श्री गणेशचतुर्थी आणि अनंत चतुर्दशी या दिवशी मिरवणुका काढण्याची अनुमती मंडळांना दिली जाणार आहे. इतर दिवशी विनाअनुमती मिरवणूक काढल्यास मंडळांवर गुन्हे नोंद करून कठोर कारवाई करण्याची चेतावणी पोलीस प्रशासनाने दिली आहे.

‘एस्आयटी’कडून १७ जणांचे अन्वेषण !

चौकशीत लिपिकांनी अत्याचाराची माहिती मुख्याध्यापकांना दिली नसल्याचे आढळून आले आहे.

दहीहंडी उत्सवातील विज्ञापनांना शुल्क सवलत नाही ! – डॉ. राजेंद्र भोसले, आयुक्त

आगामी गणेशोत्सवासाठी मंडळांकडून उभारण्यात येणार्‍या स्वागत कमानी, कमानींवरील विज्ञापने यांना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही तसेच दहीहंडी उत्सवातील विज्ञापनांना शुल्कात सवलत नसल्याचे पालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्पष्ट केले.

आरोपीला कठोर शिक्षेची भाजपची मागणी !

घटनेच्या निषेधार्थ आणि आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी २४ ऑगस्ट या दिवशी सकाळी १० वाजता विश्रामबाग येथील भाजपच्या कार्यालयासमोर भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

राज्यात ठिकठिकाणी पावसाचा जोर !

राज्यात ठिकठिकाणी पावसाचा जोर वाढला असून पुढील ३ दिवस हा जोर कायम रहाणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.