पुणे महापालिकेच्या वतीने आयोजित गणेशोत्सव मंडळांची बैठक !
पुणे – आगामी गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांकडून उभारण्यात येणार्या स्वागत कमानी, रनिंग कमानींवरील विज्ञापने यांना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही; पण रस्ते, पादचारी मार्गावर अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने विज्ञापने लावू नयेत, तसेच दहीहंडी उत्सवातील विज्ञापनांना शुल्कात सवलत नसल्याचे पालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्पष्ट केले. गणेशोत्सवातील खर्च भागवण्यासाठी मंडळांकडून मोठ्या प्रमाणात विज्ञापन कमानी लावल्या जातात. या विज्ञापन कमानींविषयी महापालिकेकडे नागरिकांकडून तक्रारी केल्या जातात. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने बैठक आयोजित केली होती.
महापालिकेच्या वतीने गणेशोत्सव मंडळांची बैठक आयोजित करतांना प्रतिवर्षी प्रसारमाध्यमांना त्याचे अधिकृतपणे निरोप दिले जातात; पण यंदा गणेशोत्सव सिद्धतेसाठी आयोजित केलेल्या बैठकीची माहिती माध्यमांना देण्यात आली नाही.