आध्यात्मिक त्रासांवर मात करण्यासाठी उपयुक्त दृष्टीकोन

सनातनचा लघुग्रंथ ‘आध्यात्मिक त्रासांवर मात करण्यासाठी उपयुक्त दृष्टीकोन’ यातील काही दृष्टीकोन ७ ऑगस्ट या दिवशी पाहिले. आज पुढील दृष्टीकोन पाहूया.

सर्वांशी जवळीक साधणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असलेले पू. रमेश गडकरी (वय ६७ वर्षे) !

श्रावण शुक्ल चतुर्थी (८.८.२०२४) या दिवशी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील पू. रमेश गडकरी यांचा ६७ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त पू. शिवाजी वटकर यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

पंचज्ञानेंद्रियांनी स्थुलातील भावस्थिती अनुभवण्यापेक्षा भावातीत होणे अधिक महत्त्वाचे आणि पुढच्या टप्प्याचे आहे !

‘एकदा एका साधकाने मला सांगितले, ‘‘पूर्वी भावजागृतीचे प्रयत्न करतांना मला माझ्या डोळ्यांसमोर गुरुचरण दिसायचे; पण आता मला गुरुचरण दिसत नाहीत.

मृत्यूनंतर स्वर्गलोकी किंवा मोक्षाला जायचा विचार न करता ईश्वरी कार्यासाठी पुन्हा पृथ्वीवर जन्म घेण्यासाठी तयार व्हा !

‘मृत्यूनंतर मला स्वर्गलोकी किंवा मोक्षाला जायचे आहे’, असा विचार अनेकांचा असतो. त्यांनी लक्षात घेतले पाहिजे की, ईश्वर त्याच्या कार्यासाठी पृथ्वीवर पुनःपुन्हा जन्म घेतो. आपणही त्यासाठी तयार असले पाहिजे.’

साधिकेला गुडघ्याच्या शस्त्रकर्माच्या कालावधीत जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

जानेवारी २०२४ मध्ये श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी मला शस्त्रकर्म करून घेण्याचे सुचवले. त्यामुळे मला धीर आला.

हिंदु जनजागृती समितीचे राष्‍ट्रीय मार्गदर्शक सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांना श्रीमद़्‍भगवद़्‍गीतेच्‍या पहिल्‍या अध्‍यायातील पहिल्‍या श्‍लोकातून शिकायला मिळालेली सूत्रे !

धर्म-अधर्म यांच्‍या या लढ्यात पांडव पंचमहाभूतात्‍मक ईश्‍वरी शक्‍तीचे प्रतीक झाले, तर कौरव हे धृतराष्‍ट्राच्‍या ममत्‍व, अहंकारी, अशुद्ध आणि आसुरी या बुद्धींचे प्रतीक ठरले !

दिव्यांग एकात्मिक शिक्षण योजना आणि समग्र शिक्षण अभियान यांतील  शिक्षकांना सेवेत घेणार ! – मुख्यमंत्री

समग्र शिक्षा अभियान आणि दिव्यांग एकात्मिक शिक्षण योजना यांतील वर्ष २००६ पासून सेवेत असणार्‍या ३ सहस्र १०५ शिक्षकांना सरकार शासकीय सेवेत घेणार आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.

गोवा-कारवार यांना जोडणारा ‘काळी’ नदीवरील ४१ वर्षे जुना पूल कोसळला

गोवा राज्य आणि कारवार यांना जोडणारा मडगाव-मंगळुरू राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वरील ‘काळी’ नदीवर असलेल्या ४१ वर्षे जुन्या पुलाचा काही भाग मंगळवार, ६ ऑगस्ट या दिवशी रात्री कोसळला.

मोकाट गुरांची समस्या सोडवण्यासाठी नजीकच्या काळात नवीन कायदा करणार ! – मुख्यमंत्री प्रमोद सावंत

मोकाट गुरांची समस्या सोडवण्यासाठी पुढच्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये नवीन कायदा करणार, असे आश्वासन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ७ ऑगस्टला विधानसभेत दिले.

गोवा सरकारचा शिलकी महसूल ५९ कोटी रुपयांवरून २ सहस्र ४०० कोटी

वर्ष २०१८ ते वर्ष २०२३ या ५ वर्षांपैकी ३ वर्षांच्या शिलकी महसुलाची नोंद झाली असून वर्ष २०२२-२३ मध्ये सर्वांत अधिक म्हणजे २ सहस्र ४०० कोटी रुपयांच्या शिलकी महसुलाची नोंद झाली असल्याचे महालेखापालांच्या अहवालात म्हटले आहे.