दिव्यांग एकात्मिक शिक्षण योजना आणि समग्र शिक्षण अभियान यांतील  शिक्षकांना सेवेत घेणार ! – मुख्यमंत्री

मुंबई – समग्र शिक्षा अभियान आणि दिव्यांग एकात्मिक शिक्षण योजना यांतील वर्ष २००६ पासून सेवेत असणार्‍या ३ सहस्र १०५ शिक्षकांना सरकार शासकीय सेवेत घेणार आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांत सध्या २ लाख ४१ सहस्र दिव्यांग विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी विविध स्तरांवर हे शिक्षक कार्यरत आहेत. या शिक्षकांना शासकीय सेवेत घेण्याविषयी सह्याद्री अतिथीगृह येथे ७ ऑगस्ट या दिवशी बैठक झाली. या वेळी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांसह अन्य मंत्री उपस्थित होते.