पंचज्ञानेंद्रियांनी स्थुलातील भावस्थिती अनुभवण्यापेक्षा भावातीत होणे अधिक महत्त्वाचे आणि पुढच्या टप्प्याचे आहे !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘एकदा एका साधकाने मला सांगितले, ‘‘पूर्वी भावजागृतीचे प्रयत्न करतांना मला माझ्या डोळ्यांसमोर गुरुचरण दिसायचे; पण आता मला गुरुचरण दिसत नाहीत. त्यामुळे ‘मी न्यून पडत आहे’, असे मला वाटते.’’ त्या वेळी इतर साधकांनी सांगितले, ‘‘हे साधक रस्त्याने जात असतांनाही भावस्थितीत असतात आणि त्यांना पाहून आमचा भाव जागृत होतो.’’

येथे आध्यात्मिक भावाच्या पहिल्या टप्प्याला त्या साधकाला गुरुचरण दिसायचे. तेव्हा तो पंचज्ञानेंद्रियांनी भावस्थिती अनुभवत होता; पण आता त्याला गुरुचरण दिसत नाहीत; म्हणून त्याला वाटत होते, ‘मी न्यून पडत आहे.’ आता त्या साधकाला गुरुचरण दिसत नसले, तरी त्याला पाहून इतरांची भावजागृती होते. हा भावस्थितीचा पुढचा टप्पा आहे. पंचज्ञानेंद्रियांनी स्थुलातील भावस्थिती अनुभवण्यापेक्षा भावातीत होणे अधिक महत्त्वाचे आणि पुढच्या टप्प्याचे आहे.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले