रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवतांना साधकाला जाणवलेली सूत्रे अन् त्याला मिळालेला आनंद !

माझी चूक नसतांनाही ती मला स्वीकारता आली; म्हणून माझा कृतज्ञताभाव जागृत होत होता. माझी अंतर्मुखता वाढली अन् सहसाधकाच्या प्रती प्रेमभाव जागृत झाला.

अज्ञानरूपी अंधाराचा नाश करणारे तेज म्हणजे सद्गुरु !

जसे सूर्याचे कार्य असते, तसेच सद्गुरूचे कार्य असते. सद्गुरु अज्ञानरूपी अंधाराचा नाश करतात. दृश्य काळोखापेक्षा, अज्ञानाचा काळोख प्रचंड असतो.

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांनी त्यांच्या भक्ताला ‘तुमच्या मृत मुलाचा लिंगदेह सुखरूप आहे’, असे सांगणे

‘तुमच्या मुलाचा लिंगदेह सूक्ष्म जगतात चंद्रलोकाज‍वळच्या एका लोकात सुखरूप आहे.’ योगतज्ञ दादाजींनी असे सांगितल्यावर कानविंदे कुटुंबियांचे दुःख हलके झाले.

मनुष्यजन्मातील चार ऋणांतून एकाच जन्मात मुक्त करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

गुरुदेव अजूनही अविरतपणे ऋषींनी लिहिलेले ज्ञान सोप्या भाषेत वेगवेगळे ग्रंथ लिहून ते समाजापर्यंत पोचवण्याची निष्काम सेवा करत आहेत.

प्रतिमहिन्याला सहस्रो लिटर भेसळयुक्त दुधाचे वितरण !

मागील वर्षभरात पडताळलेल्या १९६ नमुन्यांमध्ये २५ सहस्र ३३८ लिटर भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आले आहे. ही भेसळ करणार्‍यांकडून १३ लाख ४४ सहस्र ४१० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे; मात्र त्यानंतरही राज्यात दुधातील भेसळ थांबण्याचे नाव नाही.

अष्टविनायक देवस्थान येथे भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात !

राज्यातील अष्टविनायकांच्या देवस्थानी भाविकांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी दिल्या.

नॅशनल पार्कमधील आदिवासी पाड्यांच्या विजेसाठी उपाययोजना करावी ! – प्रवीण दरेकर, गटनेता, विधान परिषद

मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे; मात्र आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात ‘नॅशनल पार्क’मधील आदिवासी पाडे आजही विजेविना रहात आहेत, हे दुर्दैव असून शासनाने याविषयी उपाययोजना करावी’, अशी विनंती त्यांनी केली.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : मुंबईत मगरीच्या पिल्लाची तस्करी करणारा अटकेत !; कल्याणमधील लाचखोर पोलिसावर गुन्हा नोंद !…

पवई येथे मगरीच्या पिल्लाची तस्करी करणार्‍या तरुणाला वन विभागाच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी १० जुलै या दिवशी अटक केली.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सोलापूर येथे आगमन !

आषाढी वारी सोहळ्यात विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन आळंदी येथून निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे ११ जुलैला सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी येथे आगमन झाले.

आंध्रप्रदेशात ८ वर्षांच्‍या मुलीवर १२ वर्षांच्‍या मुलांकडून सामूहिक बलात्‍कार करून हत्‍या

बलात्‍कार करणारे कधी अल्‍पवयीन असू शकतील का ? आता या संदर्भात कायद्यात पालट करण्‍याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे !