भाग्यनगर (तेलंगाणा) – येथील नामपल्ली प्रदर्शन मैदानातील श्री दुर्गामातेच्या मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच बेगम बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांनी चौकशी चालू केली. स्थानिक हिंदूंमध्ये या घटनेविषयी संतापाचे वातावरण आहे.
The idol of Goddess Durga at a #DurgaPuja pandal vandalized by unknown individuals
📍Nampally grounds, Bhagyanagar (Hyderabad, Telangana)
It is well-known who vandalizes Hindu deities’ idols. Therefore, there is no alternative but to declare India a Hindu nation to instill… pic.twitter.com/PJqfvmYVe7
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 11, 2024
(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक)
नामपल्ली एक्झिबिशन सोसायटी आणि कर्मचारी यांच्याकडून प्रतिवर्षी नवरात्रीमध्ये श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. देवीच्या दर्शनासाठी येथे मोठ्या संख्येने लोक येतात. १० ऑक्टोबरच्या रात्री येथे दांडिया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दांडियाचा कार्यक्रम संपल्यानंतर काही वेळात प्रदर्शनाच्या मैदानात ही घटना घडली. पूजेच्या मंडपामध्ये घुसण्यापूर्वीच तोडफोड करणार्यांनी वीजपुरवठा खंडित करून तेथे लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यांचीही तोडफोड केली. त्यामुळे येथे या घटनेचे कोणतेही सीसीटीव्ही छायाचित्रण मिळालेले नाही.
Vandalism against Hindu deities won’t be tolerated! @TigerRajaSingh BJP MLA, Telangana
I’ve spoken to the ACP regarding the vandalism at Nampally Exhibition Grounds, Bhagyanagar, Hyderabad, demanding strict action#HindusUnderAttack#Vijayadashami #विजयादशमी #दशहरा https://t.co/i2xOjXGc1j pic.twitter.com/Fvaicc0Xs3
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 12, 2024
संपादकीय भूमिका
|